IMPIMP

EPFO | 6.5 कोटी नोकरदारांसाठी खुशखबर ! यावेळी PF खात्यात येतील जास्त पैसे, EPFO ने दिली ही महत्वाची माहिती

by bali123
EPFO | you know the balance of your pf account even without internet do this small work

नवी दिल्ली : वृत्तसंस्था 6.5 कोटी नोकरदार (Employee’s) लोकांसाठी मोठी खुशखबर आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) 6 कोटी खातेधारक मोठ्या कालावधीपासून या आशेवर होते की जुलैच्या अखेरीस पीएफ (PF) चे पैसे खात्यात (pf account) ट्रान्सफर होतील, परंतु 31 जुलैपर्यंत EPFO ने पैसे ट्रान्सफर केले नाही. मात्र, वृत्त आहे की पीएफ खातेधारकांना (PF Account Holders) PF चे पैसे याच महिन्यात ऑगस्टमध्ये ट्रान्सफर केले जातील. ईपीएफओने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर पीएफ व्याजाबाबत (PF interest rate) महत्वाची माहिती दिली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

EPFO ने काय म्हटले जाणून घ्या?

ट्विटरवर एका खातेधारकाने EPFO ला टॅग करून प्रश्न विचारला की, ईपीएफओ (EPFO) व्याजाचे पैसे कधी ट्रान्सफर करणार आहे. यावर ईपीएफओ अधिकृत ट्विटर हँडलवर रिप्लाय आला की जेव्हा व्याज खात्यात क्रेडिट केले जाईल, एकाच वेळी जमा केले जाईल आणि पूर्ण पैसे दिले जातील. कुणाचेही व्याजाबाबत नुकसान होणार नाही. मात्र, व्याजाचे पैसे केव्हा पीएफ खात्यात ट्रान्सफर केले हे सांगितले नाही. सरकारने फिस्कल ईयर 2020-21 साठी 8.5 टक्के व्याजाला मंजूरी दिली आहे.

येथे चेक करा बॅलन्स

जर तुमचा UAN नंबर EPFO कडे रजिस्टर्ड असेल तर पीएफ बॅलन्सची माहिती मेसेजद्वारे मिळेल.
यासाठी 7738299899 वर EPFOHO लिहून पाठवा.
याशिवाय रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून 011-22901406 वर मिस्ड कॉल दिल्यास EPFO च्या मेसेजद्वारे PF ची डिटेल मिळेल.

Web Title : 6 crore epfo subscribers can get 8 5 pc interest rate more money will come in pf account check details

 

हे देखील वाचा :

Crime News | कलयुग ! पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने घेतली अग्निपरीक्षा, हातावर जाळला कापूर विश्वास न बसल्याने पाजले विष

Sawan Somvar | महादेवाची पूजा करण्यासाठी बेलाच्या पानाचं महत्व काय? जाणून घ्या महत्व

Raj Kundra Porn Film Case | पॉर्न प्रकरणी पोलीस कोठडीला आव्हान देणारी राज कुंद्राची याचिका फेटाळली

Related Posts