IMPIMP

अंबानी प्रकरण : मनसे नेत्याचा खळबळजनक दावा, म्हणाले – ‘एका मोठ्या मंत्र्याने सुपारी घेऊन हा सगळा कट रचला’

by bali123
sachin vaze mns sensational claim mukesh ambani house bomb scare

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकाप्रकरणी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने खळबळजनक दावा केला आहे. अंबानी mukesh ambani यांच्या घरावर हेलिपॅडला परवानगी मिळण्यासाठी एका मोठ्या मंत्र्याने सुपारी घेऊन हा सगळा कट रचल्याचा गंभीर आरोप मनसेचे ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला आहे. हे प्रकरण अतिशय गंभीर असून पोलिसांच्या अंतर्गत वादातून हे सगळ बाहेर आले आहे. NIA या प्रकरणाचा व्यवस्थित तपास करत असून लवकरच 2-3 दिवसात मोठा गौप्यस्फोट होणार असल्याचा दावाही जाधव यांनी केला आहे.

अविनाश जाधव यांची एका मराठी वाहिनीने मुलाखात घेतली. त्यावेळी ते बोलत होते. काही दिवसापूर्वी अंबानी mukesh ambani च्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली. त्यानंतर अंबानींच्या जीवाला धोका असल्याचे म्हटले गेले. यात सुरुवातीला दहशतवादी संघटनेने पत्रक काढून अंबानी यांना हा ट्रेलर असल्याची धमकी दिली होती, मात्र परंतु हे पत्रक बनावट असल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर या प्रकरणात ज्याच्या मालकाची गाडी आढळली आहे. त्या मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथे खाडीत आढळला. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाचे गुढ वाढले होते. यातच अंबानी यांच्या घरावर हेलिपॅडला परवानगी मिळावी म्हणून हा सगळा कट रचला होता. यामुळे याचा तपास होणे गरजेचे असल्याचे जाधव यांनी म्हटले आहे. त्यामुळे तो मंत्री नेमका कोण याची चर्चा आता सुरु झाली आहे.

भाजप नेत्याचा सवाल, म्हणाले – ‘मुख्यमंत्री ठाकरे वाझेंसाठी इतक्या बैठका का घेतायत?’

शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

‘देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालतायेत? गुन्ह्यात सहभागी होऊ नका’, काँग्रेस नेत्याचं विधान

काँग्रेस नेत्याचे शरद पवारांना पत्र पाठवून आवाहन, म्हणाले – ‘पवार साहेब, प्रचाराला येऊ नका, लोकांचा गोंधळ उडेल’

Related Posts