IMPIMP

पंढरपूर पोटनिवडणूक : ‘तुम्ही पावसात भिजण्यापेक्षा शेतकऱ्यांची जमीन भिजवावी’; सदाभाऊंचा जयंत पाटलांना टोला

by pranjalishirish
sadabhau khot criticise jayant patil election campaign

पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांनी ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचारसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यानंतर आता माजी मंत्री सदाभाऊ खोत Sadabhau Khot  यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधत टोला लगावला. ‘पावसात भिजण्यापेक्षा शेतकऱ्यांची जमीन भिजवावी’ असे खोत म्हणाले.

Nitesh Rane : ‘सरकारने कुठलाही त्रास दिला तर संघर्ष अटळ

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचे निधन झाल्यामुळे पंढरपूर-मंगळवेढा ही विधानसभेची जागा रिक्त होती. त्यामुळे आता या जागेसाठी पोटनिवडणूक घेतली जात आहे. भाजपकडून समाधान आवताडे तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीकडून भगिरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आता या दोन्ही उमेदवारांमध्ये थेट लढत होणार आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. प्रचारसभांचा धडाकाही सुरु आहे. त्यातच जयंत पाटील यांची सभा सुरू असताना अचानक पाऊस पडला. मात्र, जयंत पाटील यांनी सभा सुरूच ठेवली. यावरून सदाभाऊ खोत Sadabhau Khot यांनी टोला लगावला.

‘महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री नाही याची किंमत जनतेने का मोजावी ?’

सदाभाऊ खोत Sadabhau Khot म्हणाले, ‘जयंत पाटील यांनी पावसात भिजण्यापेक्षा 35 गावांचा पाण्याचा प्रश्न मिटवावा. तुम्ही भिजण्यापेक्षा शेतकऱ्यांची जमीन भिजवा. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पोटनिवडणुकीत काही देणेघेणे नाही. त्यांची नजर विठ्ठल सहकारी कारखान्यावर आहे. पवार घराणे राज्यातील सहकार चळवळ मोडीत काढत आहेत, असेही ते म्हणाले.

‘महाराष्ट्रात लोकशाहीऐवजी ‘लॉक’शाही, फडणवीसांचा टोला

पंढरपूरची जागा राष्ट्रवादीला मिळू देणार नाही

माढा लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून जशी काढून घेतली, तशी पंढरपूर विधानसभेची जागा पुन्हा राष्ट्रवादीला मिळू देणार नाही, असा निर्धार भाजपने केला आहे.

Read More : 

‘प्राण जाये पर वचन न जाये’, असं उद्धव ठाकरेंचं कार्य’, मुख्यमंत्र्यांची पाठराखण

..हे तर ‘महावसूली’ सरकार अन् ‘जिथं जाऊ तिथं खाऊ’ ही मंत्र्यांची कामे : फडणवीस

‘महाराष्ट्रात लोकशाहीऐवजी ‘लॉक’शाही, फडणवीसांचा टोला

…तर मग रोहित पवारांवर गुन्हा दाखल करणार का ?, भाजपचा सवाल

‘हा’ केंद्र सरकारचा अमानुषपणा आहे, संजय राऊतांचा केंद्र सरकारवर घणाघात

पंढरपूर : देवेंद्र फडणवीस आक्रमक, म्हणाले – ‘…तर माझं नाव बदलून टाका’ (Video)

भिडेंच्या वक्तव्याची चौकशी करुन कारवाई करणार, जयंत पाटलांचा इशारा

Related Posts