IMPIMP

‘पेट्रोल-डिझेल’ची दरवाढ रामराज्यात वावरणाऱ्यांना शोभत नाही : संजय राऊत

by sikandershaikh
congress should think about its performance gujarat municipal election says shiv sena mp sanjay raut

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – इंधन दरवाढीवरून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) यांनी केलेल्या वक्तव्याचा शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी समाचार घेतला आहे. पेट्रोल डिझेलची दरवाढ तुम्हाला धर्मसंकट वाटत असेल तर धर्माचं राजकारण करू नका. पेट्रोल-डिझेलची दरवाढ रामराज्यात वावरणाऱ्यांना शोभत नाही असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे. माध्यमंशी बोलताना त्यांनी याबाबत भाष्य केलं.

‘मनमोहन सिंग नेहमी संकटांचा सामना करायचे’

संजय राऊत म्हणाले, पेट्रोल-डिझेल धर्मसंकट वाटत असेल तर धर्माचं राजकारण करू नका. सत्ताही भाजपला श्रीरामाच्या नावावर म्हणजेच धर्माच्या नावावर मिळाली. राजकारणात धर्माला जास्त महत्त्व दिलं जात आहे. लोकांची सर्वात मोठी समस्या म्हणजे पेट्रोल-डिझेल दरवाढ आहे. या दरवाढी संदर्भातील संकट युपी सरकारवरही आलं होतं. परंतु माजी पंतप्रधान मनमोहन सिंग नेहमीच संकटांचा सामना करायचे. तुम्ही तर पळ काढत आहात असा खोचक टोलाही राऊत यांनी यावेळी बोलताना लगावला.

‘रावणाच्या श्रीलंकेतही इंधन स्वस्त’

पुढं बोलताना राऊत (sanjay raut) म्हणाले, देशातील जनतेचे महागाई पासून रक्षण करणं हे कुठल्याही सरकारचं काम आहे. व्यापारात फायदा होतो की, तोाट हे बघायला सरकार बसलेलं नाही. आपण रामराज्यात राहतो. परंतु बाजूला असलेल्या सीता आणि रावण यांचा जन्म झालेल्या देशात म्हणजेच नेपाळ आणि श्रीलंकेत पेट्रोल-डिझेल स्वस्त आहे. त्यामुळं पेट्रोल डिझेलची दरवाढ रामराज्यात वावरणाऱ्यांना शोभत नाही अशी टीका देखील त्यांनी केली.

Related Posts