IMPIMP

Satara Lok Sabha Election 2024 | साताऱ्यातून उमेदवारी मिळेल की नाही? उदयनराजेंचे टेन्शन वाढले, फडणवीसांची घेतली भेट

by sachinsitapure

सातारा : Satara Lok Sabha Election 2024 | सातारा लोकसभेच्या जागेवरून भाजपा (BJP) आणि अजित पवार गटात (Ajit Pawar NCP) रस्सीखेच सुरू आहे. मागील निवडणुकीत येथे भाजपाचे उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांचा पराभव झाला होता, तर राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील (Shriniwas Patil) विजयी झाले होते. त्यामुळे या जागेवर अजित पवार गटावा दावा अशा अर्थाने भक्कम मानला जात आहे. या जागेचा तिढा अद्याप सुटत नसल्याने उदयनराजेंचे टेन्शन वाढले आहे. यासाठीच त्यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली.

तत्पूर्वी, भाजपा नेते मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी सातारा येथे जाऊन उदयनराजे यांची भेट घेतली होती. यावेळी महाजनांनी सातारा लोकसभेसाठी उदयनराजेंची उमेदवारी पक्की असल्याचे म्हणत आश्वस्त केले होते. त्यानंतर आता उदयनराजेंनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.(Satara Lok Sabha Election 2024)

भाजपने जाहीर केलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या उमेदवार यादीत उदयनराजेंचा समावेश नसल्याने उदयनराजे आणि
त्यांचे समर्थक नाराज आहेत. भाजप नेते गिरीश महाजन यांनी उदयनराजेंची भेट घेतली होती.

या भेटीनंतर गिरीश महाजन यांनी पश्चिम महाराष्ट्रात तीन पक्षांमध्ये उमेदवारीवरून वाटाघाटी सुरू आहेत.
चर्चेतून लवकर योग्य तो मार्ग निघेल. खासदार उदयनराजे भोसले यांची उमेदवारी नाकारण्याचा प्रश्नच येत नाही.
त्यांची उमेदवारी निश्चित होईल, असे आश्वासन दिले होते.

Pune Pimpri Chinchwad Crime | पोटच्या मुलीला गळा आवळून संपवलं, स्वत: गळफास घेऊन केली‎ आत्महत्या; वाकड परिसरातील धक्कादायक घटना

Related Posts