IMPIMP

Pune Pimpri Chinchwad Crime | पोटच्या मुलीला गळा आवळून संपवलं, स्वत: गळफास घेऊन केली‎ आत्महत्या; वाकड परिसरातील धक्कादायक घटना

by sachinsitapure

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime | आर्थिक विवंचनेतून‎ एका व्यक्तीने राहत्या घरातील किचनमध्ये गळफास (Hanging Case) घेऊन आत्महत्या केली (Suicide Case). तसेच आठ वर्षाची मुलगी घरामध्ये मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हा प्रकार काळेवाडी (Kalewadi) येथे आज (मंगळवार) पहाटे पाचच्या सुमारास उघडकीस आला आहे.(Pune Pimpri Chinchwad Crime)

भाऊसाहेब भानुदास बेदरे (वय-43, रा. गुरुनानक नगर, थेरगाव, मूळ रा. बेदरवाडी, ता. पाटोदा, जि. बीड) आणि नंदिनी भाऊसाहेब बेदरे (वय-8) अशी मयतांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार बेदरे कटुंब मागील 15 वर्षापासून पिंपरी चिंचवड शहरात वास्तव्यास आहे. भाऊसाहेब बेदरे हे खासगी नोकरी करीत होते. मात्र, काही महिन्यांपूर्वी त्यांची नोकरी गेल्याने ते चारचाकी वाहन चालवत होते. परंतु यातून पुरेसे उत्पन्न मिळत नसल्याचे त्यांना आर्थिक चणचण भासत होती.

दरम्यान, भाऊसाहेब यांची पत्नी राजश्री बेदरे या गावी गेल्या होत्या. सोमवारी रात्री त्या गावकडून निघाल्या.
पहाटे चार वाजण्याच्या सुमारास त्या शिवाजीनगर येथे आल्या. त्यांनी पतीला फोन करुन गाडी घेऊन येण्यास सांगितले.
मात्र, पती आले नसल्याने त्या घरी आल्या. त्यांवेळी घरात झोपलेल्या 15 वर्षाचा मुलगा आशिष याने घराचा दरवाजा उघडला.
राजश्री यांनी मुलीला जागे करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती उठली नाही. तसेच पती भाऊसाहेब यांनी किचनमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले.

घटनेची माहिती मिळताच वाकड पोलिसांनी (Wakad Police Station) घटनास्थळी धाव घेतली. भाऊसाहेब आणि नंदिनी यांना तात्काळ वायसीएम रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी दोघांना तपासून उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले. भाऊसाहेब यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. गावाकडील जागा विकली, मात्र, त्यातून काहीच रक्कम मिळाली नाही, असे चिठ्ठित नमूद केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Pune Lonikand Crime | प्रवासी महिलेसोबत कारमध्ये गैरवर्तन, उबेर चालकावर गुन्हा दाखल; लोणीकंद परिसरातील घटना

Related Posts