IMPIMP

Satara NCP | आमदार शिवेंद्रराजेंच्या कट्टर समर्थकानं 200 कार्यकर्त्यांसह मनगटावर बांधलं राष्ट्रवादीचं ‘घड्याळ’

by nagesh
Satara District Bank Election | satara district bank election ncp mlc shashikant shinde taunts bjp mla shivsendraraje bhosle on chairmanship post

सातारा : सरकारसत्ता ऑनलाइन Satara NCP | सातारा जिल्ह्यातील परळी येथे राजकारणाची उलथापालथ झाली असल्याचे समोर आले आहे. परळीत राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाने (Satara NCP) आयोजित केलेल्या मेळाव्यात आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde)आणि भाजपचे आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले (BJP MLA Shivendrasinh Raje Bhosale) यांच्यातील राजकारणात मोठी घडामोड होताना पाहायला मिळत आहे. आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या बालेकिल्ल्यात भाजपच्या तब्बल 200 कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे. शिवेंद्रसिंहराजेंचे कट्टर समर्थक समजल्या जाणाऱ्या शशिकांत वाईकर यांनीच प्रवेश केला असल्याने शिवेंद्रसिंहराजेंसह भाजपसाठी हा मोठा धक्का ठरला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

तेथील भोंगवडे या गावामध्ये आमदार शशिकांत शिंदे व दीपक पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळावा पार पडला.
यावेळी भाजपच्या (BJP) कार्यकर्त्यांनी प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
विशेष म्हणजे एक कट्टर समर्थक शशिकांत वाईकर (Shashikant Waikar)
यांच्यासारखा असलेला तरुण चेहरा विरोधक म्हणून उभा राहिल्याने आमदार शिवेंद्रसिंहराजे (BJP MLA Shivendrasinh Raje Bhosale) यांच्या गटाला आत्मपरीक्षण देखील करावे लागणार आहे.

 

 

दरम्यान, टेंडरसाठी राजकारणात शिरलेल्या ठेकेदारांना परळी भाग कधीही थारा देणार नसल्‍याचे स्‍पष्‍ट करत ठेकेदारांना राष्ट्रवादीत का घ्यायचे याचा विचार पक्षाने करण्‍याची गरज असल्‍याचे शिवेंद्रसिंहराजे समर्थक व पंचायत समितीचे उपसभापती अरविंद जाधव (Arvind Jadhav) यांनी म्हटले आहे. त्यावेळी त्यांनी वाईकरांवर टीका केली आहे.

 

 

Web Title :- Satara NCP | mla shivendrasinghraje worker shashikant waikar join ncp

 

हे देखील वाचा :

Pune News | पुणे जिल्हा बँक शेतकऱ्यांना आधार देणारी – राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

Pune Ganesh Festival | राष्ट्रीय एकात्मतेबरोबर अर्थव्यवस्थेला चालना देणारा उत्सव

Health Department Circular 2021 | उपचारात दिरंगाई होऊन मृत्यू झाल्यास डॉक्टरचं होईल निलंबन

 

Related Posts