IMPIMP

Ambernath News : राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षावर महिला पदाधिकार्‍याचे गंभीर आरोप

by sikandershaikh
Pune Grampanchayat Election Results 2022 | Gram Panchayat elections in Pune district dominated by NCP; 46 out of 61 village panyatis in custody

अंबरनाथ : सरकारसत्ता ऑनलाइन टीम – पोलिसावर दाखल केलेला बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी राष्ट्रवादी (ncp) कॉंग्रेसचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव पाटील आपल्यावर दबाव टाकत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीच्या एका महिला पदाधिका-याने केला आहे. मात्र, पाटील यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

संबधित तरुणी ही राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसची पदाधिकारी आहे. तिने प्रमोद हिंदुराव या पोलिसावर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, या पोलिसावर गुन्हा दाखल करण्यासाठी गेले असताना शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांनी गुन्हा दाखल करू नये यासाठी आपल्यावर दबाव आणला. तसेच तक्रार मागे घेण्यासाठी 20 लाख घेऊन देण्याचे अमिष दाखवल्याचा आरोप या तरूणीने केला आहे. मात्र पाटील यांनी या तरुणीने केलेले आरोप फेटाळले आहेत.

तसेच गुन्हा मागे घेण्यासाठीही मी कुणावरही दबाव टाकला नाही, असे म्हटले आहे. उलट ही तरुणी राष्ट्रवादीची (ncp) पदाधिकारी असूनही भाजपाच्या मंचावर होती, असा प्रत्यारोप त्यांनी केला आहे. दरम्यान, या तरुणीने या प्रकरणी थेट प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांच्याकडे देखील तक्रार केली आहे. याबाबतचे वृत्त एका मराठी वृत्त वाहिनीने दिले आहे.

Related Posts