IMPIMP

Sharad Pawar and PM Narendra Modi | पीएम मोदी आणि शरद पवारांची दिल्लीत तासभर चर्चा, तर्क-वितर्कांना उधाण

by bali123
Sharad Pawar and PM Narendra Modi | Nationalist Congress Party leader Sharad Pawar calls on Prime Minister Narendra Modi in Delhi, discussion of 50 minutes

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Sharad Pawar and PM Narendra Modi |राज्यात महाविकास आघाडी सरकार (maha vikas aghadi government) आणि भाजपमध्ये (BJP) सातत्याने टीका-टिपणीची झोड पाहायला मिळत असते. तर दुसरी गोष्ट म्हणजे महाविकास आघाडीत देखील काही दिवसापासून कुजबुज होताना दिसत आहे. यामुळे राजकीय वातावरणात तर्कवितर्क-चर्चा होऊ लागल्या आहेत. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि माजी कृषिमंत्री शरद पवार (NCP Leader Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची दिल्लीत भेट घेतली आहे. शरद पवार आणि पंतप्रधान मोदी (Sharad Pawar and PM Narendra Modi) यांच्यात जवळजवळ तासभर चर्चा झाली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

दरम्यान, केंद्रीय मंत्री पियूष गोयल (Piyush Goyal) आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी पीएमओमध्ये (PMO) गेलेत. पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांच्यात पंतप्रधान कार्यालयात जवळपास तासभर चर्चा झाली आहे. मात्र, कोणत्या विषयावर चर्चा झाली आहे याचा अजून खुलासा झाला नाही.
मात्र, या चर्चे दरम्यान सहकार आणि बँकिंग क्षेत्रासंदर्भात प्रामुख्यानं चर्चा झाल्याची माहिती पुढं आली असल्याचे समजते.

Web Titel :  Sharad Pawar and PM Narendra Modi | Nationalist Congress Party leader Sharad Pawar calls on Prime Minister Narendra Modi in Delhi, discussion of 50 minutes

Related Posts

Leave a Comment