IMPIMP

शरद पवार पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात; मलिकांनी ट्विट करून दिली माहिती

by nagesh
sharad pawar was admitted at breach candy hospital in mumbai last evening for a follow up procedure

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्यावर पित्ताशयावरील शस्त्रक्रिया नुकतीच करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती राज्याचे अल्पसंख्यांकमंत्री आणि पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विट करून दिली. शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Chandrakant Patil : ‘अजित पवार यांनी आता त्यांची झोप कमी करून पुण्यात लक्ष द्यायला हवं, झेपत नसेल तर पद सोडाव’

शरद पवार sharad pawar यांच्यावर एन्डोस्कोपी करुन त्यांच्या पित्तनलिकेतील खडा गेल्या महिन्यात काढण्यात आला होता. त्यानंतर काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर 11 एप्रिलला पुन्हा त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर 12 एप्रिलला त्यांच्या पित्ताशयावर लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र, आता पुन्हा शरद पवार यांना पुन्हा एकदा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबतची माहिती नवाब मलिक यांनी दिली. त्यानुसार त्यांनी ट्विटही केले आहे.

Coronavirus : देशात गेल्या 24 तासात 3 लाखांच्या जवळपास नवीन रुग्ण, 2 हजाराहून अधिक मृत्यू

नवाब मलिक यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले, की ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार sharad pawar काल संध्याकाळी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांच्यावर गॉलब्लॅडर शस्त्रक्रिया झाली होती. त्याच्या नियमित तपासणीसाठी ते रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांची प्रकृती सुधारत आहे’.

Also Read :

‘तत्वज्ञान सांगणार्‍या अमोल कोल्हेंनी ते ज्ञानामृत आधी सरकारी तिजोरीतून 400 कोटी खर्चून वडिलांचे स्मारक बांधणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पाजावे’

फडणवीसांवर थेट दिल्लीतून निशाणा; प्रियांका गांधींनी व्हिडिओ ट्विट करून म्हटले…

धनंजय मुंडेंच्या सामाजिक न्याय विभागाची रेकॉर्डब्रेक कामगिरी, 2003 नंतर पहिल्यांदाच अशी कामगिरी

Related Posts