IMPIMP

भाजपच्या महापौरांचा शिवसेनेच्या नगरसेवकांकडून सत्कार, पालकमंत्र्यांनी सुनावल्यानंतर दिला राजीनामा !

by sikandershaikh
BJP on Shivsena | file a case against owaisi bjps challenge to shiv sena

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – जळगाव शहरात सध्या शिवसेनेच्या (shiv sena) गटनेत्यानं भाजपच्या महापौराचा सत्कार केल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. भाजपच्या महापौर भारती सोनवणे यांचा जळगाव महापालिकेच्या महासभेत शिवसेनेच्या (shiv sena) नगरसेवकांनी जाहीर सत्कार केला. या सत्कारावरून शिवसेनेतील अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर आली आहे.

महासभेत महापौर भारती सोनवणे यांनी वर्षभरात केलेल्या कामाबद्दल त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या प्रकरणानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी नाराजी व्यक्ती केली होती. यानंतर गटनेते अनंत जोशी यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा महानगरप्रमुख शरद तायडे यांच्याकडे सोपवला. या प्रकरणावरून शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी समोर आली आहे.

जळगावात देखील इतर महापालिकांप्रमाणे भाजप विरुद्ध काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना असं समीकरण आहे. विरोधी पक्ष असलेल्या शिवसेना नगरसेवकांनी भाजपा महापौर भारती सोनवणे यांचा सत्कार केल्यानं पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी तीव्र प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली. एकीकडे विरोध असताना दुसरीकडे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना न विचारता अशा प्रकारचे कार्यक्रम करणं चुकीचं आहे असं पालकमंत्री म्हणाले आहेत.

संपर्कप्रमुख संजय सावंत यांनीही शहराच्या दौऱ्यावर असताना कोणतंही आंदोलन, कार्यक्रम, मोर्चे याबाबत जिल्हाध्यक्ष, महानगरप्रमुखांना पूर्वसूचना देऊनच करावेत अशी सूचना दिली होती.
परंतु शुक्रवारी झालेल्या महासभेत शिवसेनेचे गटनेते अनंत जोशी आणि नगरसेवक प्रशांत नाईक यांनी महापौरांचा अचानक सत्कार केला.
यामुळं संपर्कप्रमुखांनी नाराजी व्यक्त केली होती.
यानंतर त्यांना समज दिली आणि नंतर राजीनामा देण्यात आला.

Related Posts