IMPIMP

Shiv Sena Mp Sanjay Raut | संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा, म्हणाले – ‘तुमचे राजकीय भविष्य उज्वल, आम्ही तुम्हाला संन्यास घेऊ देणार नाही’

by bali123
Amravati Violence | shivsena mp sanjay raut verbal attack on bjp leader devendra fadnavis over amravati riots violence marathi news policenama

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Shiv Sena Mp Sanjay Raut | तुम्हाला जमत नसेल तर आमच्या हाती सत्ता द्या, 4 महिन्यात ओबीसींना आरक्षण देतो नाहीतर राजकीय संन्यास घेतो, असे आव्हान भाजपा (BJP) नेते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी ठाकरे सरकारला (Thackeray government) दिले होते. त्यांच्या या विधानावरून शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी चिमटे काढले आहेत. उत्तम नेतृत्व देऊ शकणाऱ्या नेत्यांची देशात अन् राज्यात कमतरता आहे. फडणवीस हे चांगल्या नेत्यांपैकी एक असून लढवय्ये आहेत. त्यांनी संन्यास घेतला तर भाजपच अन् जनतेचे मोठ नुकसान होईल. त्यामुळे त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचं मन वळवावे. आम्ही स्वत: त्यांची भेट घेऊ. मन वळवण्याचा प्रयत्न करू. आम्ही त्यांना कुठल्याही प्रकारचे संन्यास घेऊ देणार नाही. फडणवीसांचं राजकीय भविष्य उज्ज्वल असल्याचे राऊतांनी म्हटले आहे. shiv sena mp sanjay raut on devendra fadnavis comment about political sanyas, said

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

भाजपने ओबीसी आरक्षणाच्या (OBC reservation) मुद्द्यावर शनिवारी राज्यभर आंदोलन केलं होते. नागपूरातील व्हरायटी चौकात झालेल्या आंदोलनात फडणवीसांनी ठाकरे सरकारवर टीका केली होती.
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळेच राज्यातील ओबीसी अन् मराठा आरक्षण गेले आहे.
मात्र आपल्या अपयशाचे खापर ते पंतप्रधान मोदीवर फोडत आहेत.
हे आरक्षण पुन्हा मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही.
पुन्हा सत्ता आल्यास आरक्षण मिळवून देईन.
न दिल्यास राजकारणातून संन्यास घेणार असल्याची गर्जना केली होती.
त्यावर राऊतांनी पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.
आम्ही फडणवीसांना कुठल्याही प्रकारचे संन्यास घेऊ देणार नाही, असे म्हटले आहे.
तसेच सामनाच्या अग्रलेखातही फडणवीसांच्या या घोषणेवर भाष्य केले आहे.
फडणवीसांनी असा त्रागा करण योग्य नाही. संन्यास घेतील त्यांचे शत्रू असा टोला लगावला आहे.

फडणवीसांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही : बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat)

दरम्यान याच मुद्द्यावरून कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी फडणवीसांवर टीका केली आहे. सत्तेसाठी काहीही बोलायच ही भाजपची पूर्वीपासूनची पद्धत आहे. विदर्भ स्वतंत्र होत नाही तोपर्यंत लग्न करणार नाही, असेही फडणवीस म्हणाले होेते. मात्र, त्यानंतर काय झालं हे सर्वांनी पाहिले आहे. त्यामुळे त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचे ते म्हणाले.

Web Title : shiv sena mp sanjay raut on devendra fadnavis comment about political sanyas, said

Related Posts