IMPIMP

राज्यात राष्ट्रपती राजवटीच्या मागणीवरून संजय राऊतांनी विरोधकांना फटकारलं ! म्हणाले…

by pranjalishirish
shiv sena mp sanjay raut warn bjp over attempting to get presidents rule imposed in maharashtra

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – सध्या राज्यात सुरू असलेल्या विविध घडामोडींवरून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावरील गंभीर आरोप, प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराबाहेरील स्फोटकं, मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण (Mansukh Hiren Death Case) आणि दोन्ही प्रकरणांवरून एपीआय सचिन वाझे (Sachin Vaze) यांची अटक अशा अनेक प्रकरणांनंतर भाजपनं आणि वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) चे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. यावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी विरोधकांना फटकारलं आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याऐवजी केंद्रातील सरकारच बरखास्त केलं पाहिजे असा घणाघात राऊतांनी केला आहे.

पंढरपूरसाठी जनतेच्या मनातीलच उमेदवार दिला आहे, अजित पवारांनी दिले स्पष्ट संकेत

‘कालपर्यंत परमबीर सिंग यांच्यावर विरोधी पक्षांना विश्वास नव्हता, परंतु आज मात्र…’

परमबीर सिंग यांनी देशमुखांवर केलेल्या आरोपांनंतर अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. यावर राऊतांनी Sanjay Raut वक्तव्य केलं आहे. राऊत म्हणाले, अनिल देशमुखांचा राजीनामा हा राज्य किंवा देशासमोरील एकमेव प्रश्न नाहीये. राजकारणात विरोधी पक्ष आरोप करणार, आम्ही त्याला उत्तर देणार, ही प्रक्रिया सुरूच राहणार. कालपर्यंत परमबीर सिंग यांच्यावर विरोधी पक्षांना विश्वास नव्हता. परंतु आज मात्र त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सरकारची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे.

‘हा’ कटाचाच भाग, शिवसेनेने सांगितला घटनाक्रम !

‘त्यामुळं राष्ट्रपती राजवट लागू शकत नाही, उलट केंद्र सरकार बरखास्त केलं पाहिजे’

प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. ते यासाठी राज्यपालांची भेट घेणार आहेत. याकडे लक्ष वेधलं असताना संजय राऊत Sanjay Raut म्हणाले, प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत. त्यांच्याविषयी आमच्या मनात किती श्रद्धा आहे, हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावावी असं प्रकाश आंबेडकर सांगत असतील तर त्यांनी पुन्हा एकदा घटनेचा अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण ज्या प्रकारे खोटी प्रकरणं निर्माण करून विरोधी पक्ष महाराष्ट्र सरकारवर दबाव टाकतं किंवा एक प्रकरण बनवतं, त्यावरून राष्ट्रपती राजवट लागू शकत नाही किंबहुना केंद्र सरकार बरखास्त केलं पाहिजे. कारण हा राज्याच्या स्वायत्तेवर घाला आहे असंही त्यांनी सांगितलं.

Also Read : 

Pandharpur : अजित पवारांच्या बैठकीला सभेचे स्वरूप, पोलिसांत FIR दाखल

RJ : धान्याच्या कोठीमध्ये अडकले मुले, गुदमरून 5 जणांचा मृत्यू

Photos : ‘गंदी बात’ फेम महिमा गुप्ताच्या Hotness चा ‘कहर’ ! बिकिनीसोबतच शेअर केला ‘हा’ अवतार

खा. संजय राऊतांचा सरकारला सल्ला, म्हणाले -‘सरकारमधील प्रत्येक घटकानं आत्मपरीक्षण करावं’

‘तलाश नए रास्तों की है…’ खा. संजय राऊतांच्या ट्विटने राजकीय वर्तुळात खळबळ

पंढरपूरचा उमेदवार शरद पवार ठरवतील

परमबीर सिंहांच्या पत्रामुळं गृहमंत्र्यांवर राजीनाम्याचा दबाव? शरद पवारांनी अजितदादांसह ‘या’ दिग्गज मंत्र्याला बोलावलं दिल्लीत

तपासावरून लक्ष विचलित करण्यासाठी परमबीर सिंग यांचे पत्र – जयंत पाटील

शरद पवारांचा दिल्लीतून भाजपवर ‘निशाणा’, फडणवीसांनी केला ‘पलटवार’

शरद पवारांनी ‘लेटर बॉम्ब’च्या ‘त्या’ कनेक्शन कडे वेधले लक्ष, म्हणाले..

 

Related Posts