IMPIMP

महिलांना ५० % आरक्षण दिलं पाहिजे; ‘या’ महिला खासदाराची राज्यसभेत मागणी

by bali123
shivsena mp priyanka chaturvedi raise 50 percent women reservation issue parliament womens day

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – parliament | आज सर्वत्र जागतिक महिला दिन साजरा केला जात आहे. या दिनानिमित्त संसदेच्या (parliament) अर्थसंकल्पीय अधिवेशनात महिला खासदारांनी आपले विचार मांडले. राज्यसभेतील महिला खासदारांना महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन कामकाजाला सुरुवात करण्यात आली. या दिनानिमित्ताने महिला आरक्षणाचा विषय सभागृहात मांडण्यात आला. आज राज्यसभेत महिलांना केवळ ३३ टक्के आरक्षण का दिलं जात आहे? महिलांना ५० टक्के आरक्षण दिलं गेलं पाहिजे, अशी मागणी करण्यात आली.

“देशात २४ वर्षांपूर्वी महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याबद्दल सांगण्यात आलं होतं. परंतु आता ते ३३ टक्क्यांवरून वाढवून ५० टक्के केलं गेलं पाहिजे. जेव्हा देशातील महिलांची लोकसंख्या ५० टक्के आहे, तर महिलांचं प्रतिनिधित्वदेखील ५० टक्के असलं पाहिजे,” अशी मागणी शिवसेनेच्या राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केली आहे.

प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, ”लॉकडाउनदरम्यान डोमेस्टिक रूपापासून मानसिक रूपापर्यंत महिलांवरील ताण मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या विषयांवर सभागृहात चर्चा होणे गरजेचे आहे. महिलांना त्यांचे अधिकार देणं आवश्यक आहे,” असे त्यांनी आपल्या मागणीत नमूद केले आहे. यादरम्यान प्रियंका चतुर्वेदी यांनी महिलांना ५० टक्के आरक्षण देण्याबद्दल सभागृहात भाषण केले.
तसेच काँग्रेसचे नेते कार्ती चिदंबरम यांनी महिला दिनानिमित्त एक ट्विट केले आहे.
“तामिळनाडू विधानसभा निवडणुकीदरम्यान ३३ टक्के तिकिटं ही महिलांनाच देण्यात यावीत,”
असे आवाहन कार्ती चिदंबरम यांनी आपल्या ट्विटद्वारे केले आहे.

राहुल गांधींचंही ट्विट

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीदेखील ट्विटच्या माध्यमातून महिलांना शुभेच्या दिल्या आहेत.
या ट्विटमध्ये त्यांनी महिला इतिहास आणि भविष्य घडविण्यात सक्षम आहेत.
महिला इतिहास घडवू शकतात. कुणाला हे रोखण्याची परवानगी देऊ नका, असे म्हणाले आहे.

Related Posts