IMPIMP

‘हा’ केंद्र सरकारचा अमानुषपणा आहे, संजय राऊतांचा केंद्र सरकारवर घणाघात

by pranjalishirish
shivsena mp sanjay raut slam bjp on coronavirus maharashtra

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन- सुरतमधील भाजप कार्यालयात रेमडेसिविर इंजेक्शनचा मोठा साठा सापडल्याचा आरोप राष्ट्रावादी काँग्रस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला होता. नवबा मलिक यांनी केलेल्या दाव्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत Sanjay Raut  यांनीही केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. कोरोनाच्या लढाईत महाराष्ट्राला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जातेय, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

Nitesh Rane : ‘सरकारने कुठलाही त्रास दिला तर संघर्ष अटळ

संजय राऊत Sanjay Raut  म्हणाले, जर महाराष्ट्र, पंजाब आणि छत्तीसगड हे तीन राज्य कोरोनाशी लढण्यात अपयशी ठरले, असे केंद्रीय सचिवांचे म्हणणे असले तर सर्वात आधी हे केंद्र सरकारचे अपयश आहे. कारण कोरोनाची लढाई ही पंतप्रधान मोदी याच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली लढली जात आहे. केंद्राने दिलेल्या प्रत्येक सूचनांचे पालन राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. मला याचं आश्चर्य वाटतं, जी तीन राज्यं अपयशी ठरलं असं सचिव म्हणत आहेत तिथे बिगरभाजप सरकार आहे. म्हणजे ज्या ठिकाणी भाजपचे सरकार आहे त्या ठिकाणचा कोरोना पळून गेला कारण त्या ठिकाणी भाजपचे मुख्यमंत्री आहेत, असं तंत्र या लोकांनी निर्माण केले आहे का ? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

‘महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री नाही याची किंमत जनतेने का मोजावी ?’

संजय राऊत Sanjay Raut पुढे म्हणाले, केंद्र सरकारने अशा कठीण प्रसंगी अत्यंत सावध आणि संवेदनशीलपणे वागायला हवे. असे आरोप-प्रत्यारोप करु नयेत. महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची प्राण जाये पर वचन ना जाये, अशा पद्धतीने कोरोनाविरुद्ध लढाई सुरु आहे. महाराष्ट्र हे मोठे राज्य असून मुंबई, पुणे, नाशिक या प्रमुख शहरांवर देशाचा भार आहे. याचेही भान केंद्राने ठेवले पाहिजे. आज जी औषधे आम्हाला पाहिजे आहेत, लस किंवा रेमडेसिविर या गोष्टी भाजपच्या गुजरात मधील कार्यालयात हवी तेवढी मिळत आहेत. म्हणजे राजकीय पक्षाच्या मुख्यालतून ही औषधं मिळू शकतात. पण महाराष्ट्र, छत्तीसगड, पंजाब या राज्यांना ती औषधे उपलब्ध करुन दिली जात नाहीत, हा अमानुषपणा असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

Read More : 

जयंत पाटलांनी घेतला संभाजी भिडेंच्या ‘त्या’ वक्तव्याचा समाचार, सर्वत्र जोरदार चर्चा

सचिन वाझे प्रकरणावरुनही उदयनराजे आक्रमक, म्हणाले, ‘हा कोण वाझे…’

संजय राऊतांनी फडणवीसांना दिला सल्ला, म्हणाले – ‘प्रसंग बाका, सरकार कोणाचं हे पाहू नका, दिल्लीतून महाराष्ट्राला मदत मिळवून द्या’

15 लाखांची लाच घेताना आयकर विभागातील 2 अधिकारी CBI च्या जाळ्यात

Balasaheb Thorat : ‘राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या आरोपांना महत्व देत नाही’

राज्यात 30 एप्रिलपर्यंत संपूर्ण Lockdown ? मुख्यमंत्र्यांनी बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर
होऊ शकतो निर्णय

खा. विनायक राऊतांचा राणेंवर ‘निशाणा’, म्हणाले – ‘कोकण सम्राटां’ नी चिपी विमानतळाचं कंत्राट दळभद्री कंपनीला देऊन वाट लावली

Related Posts