IMPIMP

संजय राऊतांकडून ममता बॅनर्जींचा उल्लेख ‘वाघीण’ म्हणून, ‘सर्वांना पुरून उरेल’

by pranjalishirish
shivsena sanjay raut west bengal mamata banerjee bjp

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका घेतल्या जात आहेत. त्यानुसार विविध पक्षांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. भाजपने पश्चिम बंगाल राज्याकडे सर्वाधिक लक्ष दिल्याचे दिसत आहे. त्यावरून आता शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी  Mamata Banerjee यांच्याबाबत गौरोद्गार काढले. ‘ममता बॅनर्जी एकटी वाघीण सर्वांना पुरुन उरेल’, असे ते म्हणाले.

Farmers Protest : सर्वोच्च न्यायालयीन समितीची 18 राज्यातील 85 शेतकरी संघटनांसोबत चर्चा, अहवाल सुप्रीम कोर्टात सादर; लवकरच होणार सुनावणी

पश्चिम बंगाल विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यातील मतदान घेतले जात आहे. भाजपने ही निवडणूक जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांच्या प्रचारसभा घेतल्या आहेत. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्यासमोर भाजपचे तगडे आव्हान असणार आहे. त्यावर संजय राऊत म्हणाले, ‘भाजपने पश्चिम बंगालमध्ये संपूर्ण ताकद जरी उतरवली असली तरी ममता बॅनर्जी Mamata Banerjee  एकटी वाघीण सर्वांना पुरुन उरेल हे चित्र स्पष्ट दिसत आहे. यामुळे या निकालानंतरच देशाचे राजकारण कोणत्या दिशेने जात आहे आणि विरोधी पक्षांच्या आघाड्या स्थापन होऊन ते कोणती भूमिका घेत आहेत हे स्पष्ट होणार आहे.’

IPL 2021 : चेन्नई सुपर किंग्जला मोठा झटका ! ‘हा’ ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज IPL च्या बाहेर

तसेच तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पश्चिम बंगाल या चार राज्यांमध्ये ज्या निवडणुका होणार आहेत त्या देशाच्या राजकारणाच्या भविष्याची दिशा स्पष्ट करणार आहेत. यामध्ये पश्चिम बंगाल आणि आसाम ही राज्ये आहेत. तामिळनाडू आणि केरळ या राज्यांत काय होईल याचा अंदाज मांडता येऊ शकतो. मात्र, आसाममध्ये माझ्या माहितीप्रमाणे भाजपचे राज्य असेल, असेही ते म्हणाले.

वडिल राजेंद्र पवारांना ‘कृषीरत्न’ जाहीर होताच पुत्र आमदार रोहित यांचे ‘हे’ ट्विट चर्चेत

ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ पत्रावर विचार करू

देशात लोकशाहीवर हल्ले होण्याची ही पहिली वेळ नाही तर यापूर्वी असे अनेक हल्ले होत आले आहेत. याविरोधात जनता, विरोधी पक्ष लढले आहेत, म्हणूनच लोकशाही जिवंत आहे. ममता बॅनर्जी Mamata Banerjee  यांनी सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन केले असून, आम्ही त्यावर विचार करु, असेही संजय राऊत म्हणाले.

Also Read:

भाजपचं पित्त का खवळतंय ?, शरद पवार-अमित शहांच्या गुप्त भेटीवरुन शिवसेनेचे शरसंधान

शिवसेनेच्या प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर ! संजय राऊत यांच्यावर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

‘महाविकास आघाडीला पुढील 25 वर्षे धोका नाही !’

पवार-शाह गुप्त बैठक ! ‘चंद्रकांत पाटील वगैरे नेते पतंगाच्या मांजावरून एवढे वर गेले की… “

‘जितेंद्र आव्हाड यांचे CDR आणि SDR जतन करा’, हायकोर्टाचे पोलिसांचा आदेश

लष्कर पेपर लिक प्रकरण : मेजर थिरु थंगवेल याला 25 लाख रुपयांच्या बदल्यात लष्कराचा पेपर पाठविला

‘आधी बुडणार्‍या रोजगाराचे पैसे बँक अकाऊंटमध्ये जमा करा, नंतरच Lockdown लावा’

‘केवळ RSS वाले तेवढे देशभक्त आणि बाकी सगळे देशद्रोही बनलेत’

गृहमंत्री देशमुखांवर 100 कोटीच्या हप्ता वसुलीचा आरोपानंतर आता चौकशी समितीवरून ‘कलगीतुरा’, सत्ताधारी-विरोधक ‘आमनेसामने’

Related Posts