IMPIMP

अबब ! तब्बल 5 किलो सोन्याचे दागिने घालून उमेदवार पोहोचला अर्ज भरण्यासाठी

by bali123
tamil nadu independent candidate filed nomination wearing 5 kg gold jewellery

तिरुअनंतपुरम : Hari Nadar | देशातील पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहे. त्यासाठी विविध पक्षांकडून उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यातच एक उमेदवार त्याने घातलेल्या सोन्याच्या दागिन्यांमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. हा उमेदवार तब्बल 5 किलो सोन्याचे दागिने घालून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेल्याने हा एक चर्चेचा विषय ठरला आहे.

हरी नादर Hari Nadar असे या उमेदवाराचे नाव आहे. तिरुनेलवेली जिल्ह्यातील अलंगुलम विधानसभा मतदारसंघातून ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेल्या हरी नादर यांनी 5 किलो वजनाचे सोन्याचे दागिने घातले होते. त्यामुळे त्यांच्याकडे पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी त्यांच्याकडे 11.2 किलो वजनाचे सोने असल्याचे सांगितले आहे. तसेच 4.73 कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने असल्याचेही सांगितले. हरी यांनी गळ्याभोवती सोन्याच्या वजनदार साखळ्या घातल्या होत्या. ते पाहून इतर लोक त्यांच्याकडे पाहतच राहिले होते.

दरम्यान, हरी नादर यांनी सोन्याचे दागिने घातलेले फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये त्यांनी जास्त प्रमाणात सोने घातल्याचे दिसत आहे.

6 एप्रिलला मतदान
तमिळनाडूत गेल्या दहा वर्षांपासून अण्णा द्रमुक पक्षाचे सरकार सत्तेवर आहे.
राज्यातील विधानसभेचा कार्यकाल 24 मेला संपुष्टात येत आहे.
त्यानुसार, राज्यातील सर्व 234 विधानसभा जागांसाठी मतदान घेतले जात आहे.
त्यामध्ये 6 एप्रिलला मतदान होणार आहे आणि 2 मेला मतमोजणी होणार असून, निकालही लागणार आहे.

भाजप नेत्याचा सवाल, म्हणाले – ‘मुख्यमंत्री ठाकरे वाझेंसाठी इतक्या बैठका का घेतायत?’

शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

‘देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालतायेत? गुन्ह्यात सहभागी होऊ नका’, काँग्रेस नेत्याचं विधान

काँग्रेस नेत्याचे शरद पवारांना पत्र पाठवून आवाहन, म्हणाले – ‘पवार साहेब, प्रचाराला येऊ नका, लोकांचा गोंधळ उडेल’

Related Posts