IMPIMP

Union Minister Narayan Rane | ‘आम्ही विरोधी पक्षात बसायला जन्माला आलो नाही, आम्हीही सत्तेत येऊ’

by nagesh
Union Minister Narayan Rane | narayan rane attacks cm uddhav thackeray over chaos between shiv sena and bjp
रत्नागिरी : सरकारसत्ता ऑनलाइनकेंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांची पुन्हा एकदा जन आशीर्वाद यात्रा सुरु झाली आहे. त्यावेळी राणेंनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. त्याचबरोबर अनेक मुद्यावरून देखील शिवसेनेवर निशाणा साधला. तसेच, पोलिसांनाही कानपिचक्या दिल्या. पोलिसांनी कायद्याने कारवाई करावी असं म्हटलं आहे. तसेच, ‘आम्ही विरोधी पक्षात बसायला जन्माला आलेलो नाही. आम्हीही सत्तेत येऊ, असं देखील नारायण राणेंनी (Union Minister Narayan Rane) ठणकावून सांगितलं आहे. त्यावेळी राणे हे रत्नागिरी (Ratnagiri) येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

काय म्हणाले नारायण राणे?

त्यावेळी बोलताना नारायण राणे (Union Minister Narayan Rane) म्हणाले की, ‘आम्हीही भविष्यात महाराष्ट्रात सत्तेत येऊ. केंद्रात सत्तेत आहोत. वरिष्ठांकडून काहीही आदेश आले तरी अधिकाऱ्यांनी कायद्याच्या चौकटीत कारवाई केली पाहिजे. नाही तर तुम्हाला त्याचा सामना करावा लागेल, असं देखील नारायण राणेंनी म्हटलं आहे. पुढं म्हणाले, सभेची बंधनं फक्त नारायण राणेंनाच आहे का? आम्हाला मनाई का? कोरोनाची लाट होती तेव्हा कारवाई झाली नाही? आता संपल्यावर कारवाई होतेय. त्यांना विरोध करू दे ही सत्तेची मस्ती आहे. कायदा सुव्यवस्था राहिला नाही. घरात घुसून बलात्कार होत आहेत. दरोडे पडत आहेत. खून मारामारी विचारू नका. सुशांतची हत्या झाली. दिशा सालियानची बलात्कार करून हत्या झाली. आरोपी नाही मिळाले. असं अनेक प्रकरणं आहेत. त्याचे खरे आरोपी नाही मिळाले. ते मिळणारही नाही, असं राणेंनी म्हटलंय.

पुढं बोलताना राणे म्हणाले, ‘राणेंच्या पाठी लागू नका. नाही तर मी आता थोडंच बोलतोय. नाही तर
सर्वच बोलावं लागेल. ते परवडणार नाही. केसेस काढू हे काढू. अरे मी एवढाच क्रिमिनिल होतो तर मुख्यमंत्री कसं केलं? शाखाप्रमुख, नगरसेवक, आमदार, मंत्री कसं केलं? पहिली पदं तुम्हीच दिलं ना? तेव्हा विरोध का केला नाही? 39 वर्षात शिवसेनेसाठी (Shiv Sena) जे काही केलं, साहेबांना जेव्हा अतिरेक्याकंडून धोका होता, साहेबांना जेव्हा मातोश्री सोडायला सांगितलं. तेव्हा साहेबांनी सुपुत्राला सोबत घेतलं नाही, असं नारायण राणे (Union Minister Narayan Rane) म्हणाले.

 

Web Title : Union Minister Narayan Rane | narayan rane attacks cm uddhav thackeray over chaos between shiv sena and bjp

 

हे देखील वाचा :

Pune News | पुण्यातील हवेली प्रांत अधिकारी बारवकर यांची तडकाफडकी बदली

Shivsena and Congress | वेळ संपली तरीही मुख्यमंत्र्यांकडून प्रचार: कॉंग्रेस नेत्याची सेनेच्या आमदाराविरुद्ध हायकोर्टात याचिका

 

Related Posts