IMPIMP

Vijay Wadettiwar | विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा, म्हणाले -‘फडणवीस आणि गडकरी यांच्यात 36 चा आकडा’

by nagesh
Vijay Wadettiwar | vijay wadettiwars big claim about differences between bjp leader devendra fadnavis and minister nitin gadkari

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  राज्यात 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला (Shivsena BJP alliance) स्पष्ट बहुमत मिळाले होते. परंतु त्यानंतर घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर भाजपला विरोधी पक्षात बसावे लागले. त्यावेळी राज्यात घडलेल्या घडामोडी बाबत राज्य सरकारमधील मंत्री आणि काँग्रेसचे (Congress) नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची जिरवायची हे भाजप नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्याशी बोलून आधीच ठरवलं होतं, असा खळबळजनक गौप्यस्फोट विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

देवेंद्र फडणवीस यांची जिरवायची हे भाजप नेते नितीन गडकरी यांच्याशी बोलून आधीच ठरवलं होते. तसेच देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी या भाजपच्या दोन बड्या नेत्यांमध्ये 36 चा आकडा असलाचा दावा विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला. नांदेड (Nanded) येथील बिलोली येथील प्रचारसभेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी हा दावा केला आहे.

वडेट्टीवार म्हणाले, नागपूरवाल्यांना (Nagpur) माहित आहे. तिकडे भाजपमध्ये दोन टोके आहेत. एकीकडे देवेंद्र फडणवीस तर दुसरीकडे नितीन गडकरी, दोघांची तोंडं विरुद्ध दिशेला आहेत. दोघांमध्ये 36 चा आकडा आहे. म्हणून गडकरींनी कानामध्ये गुपचूप सांगितले की, फडणवीसांची जिरवायची होती. तशी ती जिरली. आता पुन्हा जिरवायचीय. पण कुणाची जिरेल ते कळेल. मात्र मी सांगतो पुढचं केंद्रातील सरकार (Central Government) मात्र बदलणार आहे.

 

Web Title: Vijay Wadettiwar | vijay wadettiwars big claim about differences between bjp leader devendra fadnavis and minister nitin gadkari

 

हे देखील वाचा :

Actress Ananya Pandey | अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरी NCB पथक दाखल; चौकशीसाठी दिलं समन्स

Pune Crime | पुणे जिल्ह्यात प्रचंड खळबळ ! शिरुरमधील ‘बँक ऑफ महाराष्ट्र’वर भरदिवसा ‘सशस्त्र’ दरोडा; कोट्यावधीचं सोनं आणि रोकड लंपास (CCTV व्हिडीओ)

Pune News | क्रांनीच सोलर व रोटरी क्लब ऑफ पुणे युनिव्हर्सिटीच्या रक्तदान शिबीरात 41 जणांचे रक्तदान

 

Related Posts