IMPIMP

फडणवीसांसोबत आजही चांगला संवाद, खा. संजय राऊतांनी सांगितले ‘गुपित’

by sikandershaikh
sanjay-raut-devendra-fadnavis

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनविरोधी पक्षनतेने देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्याशी आपला संवाद आहेच. त्यामुळे त्यांची मुलाखत मी घेणार आहे, पण पेपर न होता रिझल्ट बघायला मिळेल, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. मात्र ही मुलाखत केंव्हा होणार हे सांगायला त्यांनी नकार दिला. तसेच सेलिब्रिटींच्या ट्विट संदर्भात राऊत म्हणाले पूर्वीच्या सेलिब्रिटींचा चळवळींशी संबंध होता आणि  त्यांना राष्ट्रीय भान होते, असे म्हणत त्यांनी सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांच्यावर निशाणा साधला.

खासदार संजय राऊत शनिवारी (दि. 20) पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी विविध मुद्द्यांवर संवाद साधला. अजित पवार यांच्यावर मुख्यमंत्री ठाकरे यांचा प्रभाव असून ते मास्तरांच्या भूमिकेत आहेत. पवार कोरोना स्थिती चांगली हाताळत आहेत असेही वक्तव्यही राऊत यांनी केले. राज ठाकरे यांच्या अयोध्या दौ-याबाबत राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्यानंतर राम मंदिर बांधायला चालना मिळाली. राज ठाकरे अयोध्येत जातील तेंव्हा त्यांना शिवसेनेचे काम बघायला मिळेल, असे ते (devendra fadnavis) म्हणाले. तसेच विरोधकांनी धार्मिक राजकारण करत मंदिरे उघडायला लावली आता कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. याचे उत्तर ते देणार आहेत का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

Related Posts