IMPIMP

Kidnapping-Murder Case | इंस्टाग्राम स्टेटसमुळे खून ! अपहरण करुन तरुणाचा खून, दृष्यम स्टाईल खुनाचा गुन्हा महाळुंगे पोलिसांकडून उघड

by sachinsitapure

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Kidnapping-Murder Case | खेड तालुक्यातील (Khed) महाळुंगे येथील तरुणाचे अपहरण करुन खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपींनी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी केलेल्या तपासात आरोपीने खुनाच्या गुन्ह्याची कबुली दिली. आदित्य युवराज भांगरे (वय-18 रा. भांगरे वस्ती, महाळुंगे ता. खेड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

चाकण पोलीस ठाण्याच्या (Chakan Police Station) हद्दीत 18 मार्च रोजी रासे फाटा येथील मराठा हॉटेलमध्ये (Hotel Maratha Chakan) गोळीबार केल्याची घटना घडली होती. यामध्ये स्वप्नील शिंदे याने फिर्याद दिली होती. या गुन्ह्यातील आरोपी अमर नामदेव शिंदे Amar Namdev Shinde (वय-25 रा. कासार आंबोली ता. मुळशी) याला तपास पथकाने 23 मार्च रोजी ताब्यात घेतले. त्याच्याकडे कौशल्यपूर्वक चौकशी केली असता त्याने मराठा हॉटेलमध्ये गोळीबार करण्याच्या दोन अगोदर म्हणजेच 16 मार्च रोजी आदित्य भांगरे याचा खून केल्याची धक्कादायक माहिती दिली. पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता आदित्य भांगरे हा बेपत्ता असल्याबाबत महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे समजले. त्यानुसार चाकण पोलिसांनी अधिक तपासासाठी आरोपीला महाळुंगे एमआयडीसी पोलिसांच्या (Mahalunge MIDC Police Station) ताब्यात दिले.

इंस्टाग्राम स्टेटसमुळे खून

महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी केलेल्या तपासात रेकॉर्डवरील गुन्हेगार राहुल संजय पवार (Rahul Sanjay Pawar) याचा भाऊ रितेश संजय पवार (Ritesh Sanjay Pawar) याचा तीन महिन्यापूर्वी खून झाला होता. खुनाचा छिन्न विछिन्न झालेल्या चेहऱ्याचा फोटो आदित्य भांगरे याने इन्स्टाग्रामवर वारंवार (Instagram Status) स्टेटसला ठेवला. याच रागातून राहुल पवार दोन साथीदारांसोबत मिळून भांगरे याचे कारमधून अपहरण केले. त्याला मारहाण करुन वायरने गळा आवळून त्याचा कारमध्येच खून केला होता.

पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळला

आदित्य भांगरे याचा खू केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळला. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी खेड तालुक्यातील निमगाव येथे निर्जन स्थळी आदित्याचा मृतदेह जाळल्याचा बनाव केला. तसेच आदित्याचा मोबाईल फोन गोवा येथे एका आरोपीसोबत पाठवला. त्यामुळे तांत्रिक विश्लेषणात तो गोवा येथे असल्याचे दिसत होते. दोन्ही ठिकाणी आदित्यचा मोबाईल आणि मृतदेह जाळल्याचा कोणताही पुरावा पोलिसांना मिळाला नाही. त्यामुळे पोलिसांनी आदित्यचे ज्या ठिकाणाहून अपहरण केले त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज मिळवून आरोपी ज्या मार्गाने गेले त्याचा माग काढला.

गोवा सीमेवर जाळला मृतदेह

आरोपींनी आदित्य भांगरे याला गाडीतच ठार मारून त्याचा मृतदेह महाराष्ट्र-गुजरात सीमेवर असलेल्या वेलवाडा गुजरात येथे एका जंगल परिसरात जाळला होता. पोलिसांनी वेलवाडा येथून अर्धवट जळालेला मृतदेह ताब्यात घेतला आहे. मृतदेह ओळख पटविण्याच्या अवस्थेत नसल्याने त्याची डीएनए तपासणी करून ओळख पटवली जाणार असल्याचे पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार (DCP Dr Shivaji Pawar) यांनी सांगितले.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त परिमंडळ-3 डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त चाकण विभाग राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली चाकणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, महाळुंगे एमआयडीसीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते, पोलीस निरीक्षक गुन्हे संतोष कसबे, सहायक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे, प्रसंन्न जऱ्हाड, पोलीस उपनिरीक्षक नामदेव तलवाडे, संतोष जायभाय, सहायक फौजदार सुरेश हिंगे, पोलीस अंमलदार भैरोबा यादव, संदीप सोनवणे, राजू जाधव, हनुमंत कांबळे, शिवाजी चव्हाण, निखील शेटे, नितीन गुंजाळ, सुनील भागवत, संदीप गंगावणे, अशोक दिवटे, प्रदीप राळे, निखील वर्पे, महेश कोळी, माधुरी कचाटे, राजेंद्र कोणकीरी, अमोल बोराटे, तानाजी गाडे, विठ्ठल वडेकर, अजय गायकवाड, संतोष वायकर, गणेश गायकवाड, राजेंद्र खेडकर, शरद खैरे यांच्या पथकाने केली आहे.

Pune Sinhagad Road Crime | अल्पवयीन मुलांना गाडी दिल्याने पालकांवर सिंहगड रोड पोलिसांकडून गुन्हा

Related Posts