IMPIMP

Money Laundering Case | मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात राज्य गृह विभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांना ईडीचं समन्स

by nagesh
Money Laundering Case | akola sp IPS Officer G Shreedhar summoned by ed in anil deshmukh money laundering case

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन –  Money Laundering Case | माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Home Minister Anil Deshmukh) यांच्याशी संबंधित कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात (Money Laundering Case) राज्याच्या गृहविभागाचे उपसचिव कैलास गायकवाड (Deputy Secretary Kailas Gaikwad) यांना ईडीने समन्स बजावले आहे. त्यांना चौकशीसाठी आज हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात ANI या न्यूज एजन्सीने ट्विट केलं आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

दरम्यान, उपसचिव कैलास गायकवाड यांनी यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. अनिल देशमुख हे आतापर्यंत ईडीच्या चौकशीला हजर राहिले नाही. ईडीने त्यांना अनेकदा समन्स बजावले. मात्र ते एकदाही हजर राहिले नाही. त्यामुळे कैलास गायकवाड हेही ईडी (ED) चौकशीला उपस्थित राहणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (former mumbai police commissioner param bir singh) यांनी १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केला (Money Laundering Case) होता. तसे पत्र त्यांनी मुख्यमंत्री यांना दिले होते. बार मालकांकडून दरमहा १०० कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश सचिन वाझेला दिल्याचं परमबीर यांनी पत्रात म्हटलं होतं. त्यानंतर गृहमंत्री पदाचा अनिल देशमुख यांना राजीनामा ही द्यावा लागला होता. तसेच पीएमएलए कायद्याच्या (PMLA Act) अंतर्गत ईडीकडून तपास सुरू आहे.

 

 

 अनिल देशमुखांच्या संबंधित मालमत्तांवर आयकर विभागाची धाड

सीबीआयने (CBI) पहिल्यांदा म्हणजे २५ मार्चला अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील घरी छापा टाकला होता त्यांनतर २४ एप्रिलला ईडीकडून छापेमारी झाली. पुन्हा ईडीने १६ मे, २६ मे तसेच १६ जुलै आणि ६ ऑगस्टला कारवी केली होती.
त्यानंतर आयकर विभागाने (Income Tax Department) ही धाडसत्र राबवले.
अनिल देशमुख यांच्याशी संबंधित ठिकाणांवर १७ आणि १८ सप्टेंबर रोजी आयकर विभागाने धाड टाकली होती.
यावेळी नागपुरातील (Nagpur) साई शिक्षण संस्थेच्या (sai education society) कार्यालयाची झाडाझडती घेतली.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात (Money Laundering Case) ईडीने दोन महिन्यांपूर्वी अनिल देशमुख यांची चार कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. या कारवाईत देशमुखांची स्थावर मालमत्ता जप्त केली आहे.
त्यामुळे ईडीने त्यांना मोठा झटका दिल्याचे मानले जात आहे.

 

Web Title : Money Laundering Case | ed summons maharashtra deputy home secretary kailas gaikwad in money laundering case after anil deshmukh

 

हे देखील वाचा :

Health Tips | आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहेत ‘हे’ 5 प्रकारचे चहा; जाणून घ्या फायदे

Petrol Diesel Price | दोन दिवसात पेट्रोल प्रति लिटर 42 पैशांनी तर डिझेल 57 पैशांनी महागले

Pune Crime | पुण्याच्या कात्रज परिसरात डोक्यात वीट पडून महिलेचा मृत्यु

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात गुंगीचे औषध देऊन महिलेवर बलात्कार ! शारीरीक संबंधाचे ‘विवस्त्र’ फोटो व्हायरल करण्याची धमकी

 

Related Posts