IMPIMP

Pune Crime | अजित पवारांच्या PA शी ओळख असल्याचे सांगून उकळले 10 लाख; बंडगार्डन पोलिसांकडून वाईमधील एकाला अटक

by nagesh
Pune Crime News | Cheating With Retired Assistant Commissioner of Police; Extortion was threatened with financial loss

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या मोबाइल क्रमांकाचा वापर करुन पुणे शहरातील (Pune Crime) एका बांधकाम व्यावसायिकाकडे (Builder) 20 लाख रुपयांची खंडणी (Ransom) मागितल्याचा प्रकार समोर आला होता. यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे सचिव भूषण गगराणी (Secretary Bhushan Gagrani) यांचे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वीय सहाय्यकांच्या (PA) नावाने 10 लाख उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundgarden Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला असून याप्रकरणी एकाला अटक (Arrest) करण्यात आली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

प्रविण विठ्ठल जगताप Pravin Vitthal Jagtap (रा. वाई, सातारा – Satara) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर त्याच्या अन्य एका साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महेश विश्वास पटवर्धन Mahesh Vishwas Patwardhan (वय – 42 रा. राजयोग सोसायटी, वारजे) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पुणे महापालिकेमार्फत Pune Municipal Corporation (PMC) विविध विकास कामे (Development work) केली जातात.
त्यापैकी 5 कोटी रुपयांचे बजेट लॉकिंग करुन दोतो.
माझी मुसळे यांच्याशी ओळख आहे. तुमचे काम होऊन जाईल, असे स्वत:ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वीय सहाय्यकाशी ओळख असल्याचे आरोपी आणि त्याच्या साथिदाराने फिर्यादी यांना सांगितले.
तसेच भूषण गगराणी आणि त्यांचे पीए हेमंत केसळकर (Hemant Kesalkar) यांच्यासोबत देखील ओळख असल्याचे फिर्यादी पटवर्धन यांना सांगितले.

 

फिर्यादी यांनी आरोपींवर विश्वास ठेवून त्यांना 10 लाख रुपये दिले.
मात्र पैसे देऊनही काम करत नसल्याने आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
त्यानंतर बंडगार्डन पोलिसांनी प्रवीण जगताप याला अटक केली. पुढील तपास बंडगार्डन पोलीस करीत आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  Pune Crime | 10 lac rs swindled from a person in the name of ajit pawars pa bundgarden police arrest Pravin Vitthal Jagtap of Wai

 

 

हे देखील वाचा :

Ganesh Bidkar | भाजप नेते गणेश बिडकर यांचे पुणे महापालिकेतील सभागृह नेतेपद उच्च न्यायालयाकडून रद्द

Yashwant Jadhav | यशवंत जाधव गैरव्यवहार प्रकरण : प्राप्तिकर विभागाच्या रडारवर 12 शेल कंपन्या

Protein Veg Food | ‘या’ 5 व्हेजिटेरियन वस्तूंमध्ये ‘चिकन लेगपीस’पेक्षा जास्त प्रोटीन, डाएटमध्ये करा समावेश

Datta Bhairat | गोखलेनगर-सेनापती बापट रस्ता ते पंचवटी (पाषाण) बोगदा रद्द करावा; दत्ता बहिरट यांची मागणी

 

Related Posts