IMPIMP

Pune Crime | आजारी मामाला पाहायला जाणं पडलं 55 लाखात, चोरट्यांचां रोख रक्कम आणि दागिन्यांवर डल्ला; पुणे जिल्ह्यातील घटना

by nagesh
Pune Crime | At the beginning of the new year, house burglaries in the area of Kothrud, Sinhagad road, 64 lakhs of compensation was lost.me | Went to dinner and thieves cleaned the house, 66 lakh house burglary in broad daylight in elite society of Baner area

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – Pune Crime | मामाच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी पुण्यात आले असताना फुलगाव येथील एका किराणा व्यावसायिकाच्या (Grocery Professional) घरात चोरट्यांनी चोरी (Theft) केली. चोरट्यांनी (Pune Crime) घरातील 51 लाख रुपये रोख (Cash) आणि 33 तोळे सोन्याचे दागिने (Gold Jewelry) असा एकूण 55 लाख 68 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. हा प्रकार 10 ते 13 नोव्हेंबर दरम्यान हवेली तालुक्यातील (Haveli Taluka) फुलगाव (Phulgaon) येथे घडला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत सतीश राका Satish Raka (वय-31 रा. फुलगाव) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा (FIR) दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा किराणा दुकानाचा व्यवसाय आहे. पुण्यात राहणाऱ्या मामाची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना पाहण्यासाठी राका कुटुंब पुण्यात आले होते. याच संधीचा फायदा चोरट्यांनी घेतला. चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून प्रवेश केला.कपाटातील सोने-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 55 लाख 68 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

 

 

असा झाला उलगडा

फुलगाव शिवारातील एका शेतकऱ्याच्या विहिरीमध्ये एक पिशवी सापडली. यामध्ये फिर्यादी यांच्या वडिलांचे ओळपत्र आणि लाईट बील सापडले. शेतकऱ्याने फिर्यादी यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.
मात्र संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांच्या दुसऱ्या नातेवाईकांना या पिशवीबाबत माहिती दिली.
त्यानंतर फिर्यादी यांनी घरी येऊ पाहिले असता चोरीची घटना उघडकीस आली आहे.
फिर्यादी यांनी तक्रार दाखल करताच पोलिसांनी चोरट्यांचा तपास सुरु केला आहे.

 

 

Web Title :- Pune Crime | 55 lakhs had to come to mamas village burglary in grocers house

 

हे देखील वाचा :

Vinayak Raut | ‘गद्दारांना पुन्हा घरात घेऊ नका, ती कीड आहे’ – विनायक राऊत

Devendra Fadanvis | “चार जागांसाठी शिवसेनेची बेईमानी…”; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दावा

Raju Shetti | बदल्यांच्या नावाखाली मंत्री आणि त्यांचे बगलबच्चे अधिकाऱ्यांकडून खंडणी वसूल करतात, राजू शेट्टींचा गंभीर आरोप

 

Related Posts