IMPIMP

Pune Crime | पुण्यातील सराईत गुन्हेगार रोहन गायकवाड व त्याच्या टोळीवर ‘मोक्का’, आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 85 वी कारवाई

by nagesh
Pune Crime | MCOCA Action on Nagpure gang in Mundhwa, Pune Police Commissioner Amitabh Gupta's 112th action till date

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनपुणे शहरातील गुन्हेगारावर (Pune Crime) आळा घालण्यासाठी आणि शहरात कायदा व सुव्यवस्था (Law and Order) टिकून ठेवण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईचा (MCOCA Action) Mokka बडगा कायम ठेवत आतापर्यंत 85 टोळ्याविरुद्ध कारवाई करुन गुन्हेगारांची रवानगी कारागृहात केली आहे. पुण्यातील (Pune Crime) विमानतळ पोलीस ठाण्याच्या (Vimantal Police Station) हद्दीत दहशत पसरवणारा सराईत गुन्हेगार रोहन अशोक गायकवाड (Rohan Ashok Gaikwad) व त्याच्या टोळीतील 8 जणांवर पुणे पोलीस (Pune Police) आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. आयुक्तांनी आजपर्यंत 85 आणि चालु वर्षात 22 टोळ्यांवर मोक्का कारवाई केली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

टोळी प्रमुख रोहन अशोक गायकवाड (वय – 25 रा. लोहगाव, पुणे) व त्याच्या 8 साथीदारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई केली आहे. आरोपी रोहन गायकवाड याच्या टोळीने वर्चस्व व दहशत प्रस्थापित ठेवण्यासाठी विमानतळ, येरवडा (Yerawada Police Station), चंदननगर पोलीस ठाण्याच्या (Chandan Nagar Police Station) हद्दीत दहशत निर्माण केली आहे. या टोळीने खूनाचा प्रयत्न (Attempted Murder), दुखापत, गंभीर दुखापत, जबरी चोरी, घरफोडी (Burglary), बेकायदेशीर घातक शस्त्र बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या टोळीविरुद्ध यापूर्वी प्रतिबंधक कारवाई (Preventive Action) करण्यात आली होती. मात्र त्यांच्यामध्ये काहीच सुधारणा झाली नाही.

 

आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव (Senior Police Inspector Bharat Jadhav), पोलीस निरीक्षक गुन्हे मंगेश जगताप (Police Inspector Mangesh Jagtap) यांनी पोलीस उपायुक्त परीमंडळ 4 रोहिदास पवार (DCP Rohidas Pawar) यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग नामदेव चव्हाण (Addl CP Namdev Chavan) यांच्याकडे प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावाला अपर पोलीस आयुक्तांनी मंजूरी दिल्याने आरोपींविरुद्ध मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास येरवडा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव (Yerawada Division ACP Kishore Jadhav) करीत आहेत.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (Jt CP Joint Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 रोहीदास पवार,
सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव,
पोलीस निरीक्षक गुन्हे मंगेश जगताप (Police Inspector Mangesh Jagtap) यांनी केली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

आयुक्तांची 85 वी मोक्का कारवाई

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे शहर पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्विकारल्यानंतर गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर पावलं उचलली आहेत.
शरिराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणाऱ्या व लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत 85 तर चालु वर्षात 22 गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

 

 

Web Title :- Pune Crime | 85th MCOCA Mokka action of Commissioner Amitabh Gupta against Pune Criminals MCOCA Against Rohan Gaikwad and his gang

 

हे देखील वाचा :

Devendra Fadnavis And Ajit Pawar | अजित पवार-फडणवीसांची गुप्त भेट ? शिवसेना नेते एकनाथ शिंदेंच्या बंडापूर्वीच्या ’त्या’ रात्री काय घडलं

Maharashtra Political Crisis | आमदारांना तातडीचे आदेश ! कोणत्याही क्षणी मुंबईत यावे लागेल, संपर्कात रहा – भाजप

Pune Crime | बहिणीच्या दिराकडून शारिरीक संबंधाची मागणी ! बदनामी केल्याने तरुणीची आत्महत्या, विमाननगर परिसरातील घटना

 

Related Posts