IMPIMP

Pune Crime | आंदोलन करणार्‍या 2500 रिक्षाचालकांवर गुन्हा दाखल

by nagesh
Pune Crime | A case has been registered against 2500 rickshaw pullers who are protesting

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime | बाइक टॅक्सी सेवा देणार्‍या कपन्यांवर कारवाई करुन ती तात्काळ बंद करावी, या मागणीसाठी
आरटीओ समोर (RTO Office Pune) ठिय्या आंदोलन करुन रिक्षा चौकात पार्क करुन संपूर्ण आरटीओ चौकातील वाहतूक अडवून शासकीय
अधिकार्‍यांच्या आदेशाचा अवमान करणार्‍या रिक्षा संघटनांच्या नेत्यांसह अडीच हजार रिक्षाचालकांवर पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

बघतोय रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर, बाबा कांबळे, आनंद अंकुश व इतर २३०० ते २५०० रिक्षाचालकांवर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

 

आर टी ओ कार्यालयाबाहेर विविध रिक्षा संघटनांनी सोमवारी ठिय्या आंदोलन केले होते.
त्यासाठी त्यांनी संपूर्ण परिसरात रिक्षा उभ्या करुन वाहतूक अडविली होती. सकाळी १० वाजता सुरु झालेले हे आंदोलन पालकमंत्री व इतरांच्या आश्वासनानंतर रात्री सव्वाआठ वाजता मागे घेण्यात आले होते. या काळात परिसरातील संपूर्ण वाहतूक विस्कळीत झाली होती. आंदोलन काळात संपूर्ण चौकातील वाहतूक अडवून स्पीकरवरुन घोषणा देऊन बंदोबस्तावरील अधिकारी व अंमलदार यांनी त्यांना आंदोलन न करण्याबाबत सूचना व आदेश दिले होते. त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करुन शासकीय अधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे पालन न करता अवमान केल्याने गुन्हा दाखल करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime | A case has been registered against 2500 rickshaw pullers who are protesting

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पावणे 10 कोटींचा अपहार केल्याप्रकरणी कोथरुड येथील लक्ष्मीबाई नागरी पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार यांना अटक, संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल

Pune ACB Trap | 42 लाख रूपयांचे लाच प्रकरण ! तत्का. तहसीलदार रंजना उमरहांडे, महसूल सहाय्यक स्वाती शिंदे, तलाठी सरफराज देशमुखसह 5 जणांवर पुणे अ‍ॅन्टी करप्शनची कारवाई, जाणून घ्या प्रकरण

MNS Chief Raj Thackeray | ‘मी पुढची निवडणूक जिंकणार आणि…’, मनसे प्रमुख राज ठाकरेंचे मोठे वक्तव्य

 

Related Posts