IMPIMP

Pune Crime | पुण्यात गस्तीवरील वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर गुंडाच्या टोळक्याची दगडफेक

by nagesh
Pune Crime News | Chandannagar Police Station - Police constable rapes woman by showing fear of implicating her son and husband in a false crime, police constable accused of extorting 1 lakh by threatening defamation by implicating her in the crime of rape

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime | मध्यरात्रीच्या वेळी पान शॉपसमोरील गर्दीला घरी जाण्यास सांगितल्याच्या कारणावरुन गुंडाच्या टोळक्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षकांवर (Senior Police Inspector) दगडफेक केल्याचा प्रकार समोर आला आहे (Stone Pelting On Police Inspector In Pune) . याप्रकरणी पोलिसांनी दंगल माजविल्याचा १० ते १२ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी पोलीस नाईक गोविंद भारत फड यांनी वारजे पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४९४/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी दिग्वीजय ककाराम वाघमोरे (वय १९, रा. रामनगर, वारजे), व्यंकटेश प्रमोद पिलवणकर (वय १९), अमोल निलेश पवार यांना अटक केली आहे. त्यांचे साथीदार लाल्या खान, आप्पा लोंढे, खंड्या वाघमारे व इतर साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. दिग्वीजय वाघमारे हा सराईत गुन्हेगार आहे. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डीएस हाके
(Senior Police Inspector DS Hake) हे कोथरुड विभागात (Kothrud Area) गुरुवारी मध्यरात्री
रात्रगस्तीवर होते. मध्यरात्री सव्वा वाजण्याच्या सुमारास गणपती माथा (Ganpati Matha Kothrud) येथे
त्यांना रॉयल पान शॉपसमोर गर्दी दिसली. त्यामुळे त्यांनी आपली पोलीस व्हॅन थांबवून हे पान शॉप बंद
करायला लावले व लोकांना तेथून निघून जाण्यास सांगितले.
तेव्हा दिग्वीजय वाघमारे व त्याचे साथीदारांनी जमाव करुन पोलीस अधिकारी व त्यांच्या सहकार्‍यांच्या दिशेने दगडफेक करुन गल्लीत पळून गेले. पोलिसांनी त्यांच्यातील तिघांना अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक जवळगी तपास करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime | A gang of goons pelted stones on a senior police inspector on patrol in Pune warje malwadi police station ganpati matha kothrud

 

हे देखील वाचा :

Rajabhau More Passes Away | मराठी मनोरंजन सृष्टीतून वाईट बातमी; ज्येष्ठ रंगकर्मी राजाभाऊ मोरे यांचे निधन

R M D Foundation | आर एम डी फाऊंडेशनच्या स्पर्धा युवकांना एकत्रीत बांधण्याचे कार्य करते, शोभा आर धारीवाल यांचे प्रतिपादन

Health Tips | निरोगी शरीरासाठी रोज करा या फूडचे सेवन, वेट लॉस आणि इम्युनिटी वाढण्यासह होतील हे ७ मोठे फायदे

 

Related Posts