IMPIMP

Pune Crime | …म्हणून शाळा सुटताच ‘मॉनिटर’ला बांबू अन् बेल्टने केली बेदम मारहाण; कोंढवा परिसरातील घटना

by nagesh
Pune Crime News | Pune-Rasta Peth Crime News: Shopkeepers beaten up for extortion, four arrested

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | शाळेतील मॉनिटरने (School Monitor) सर्वांसमोर विचारलेल्या प्रश्नाच्या रागातून एका विद्यार्थ्याने वर्गातील इतर विद्यार्थ्यांच्या मदतीने ‘मॉनिटर’ला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. हा प्रकार पुण्यातील (Pune Crime) कोंढवा (Kondhwa) परिसरातील एका शाळेत घडला आहे. याप्रकरणी पीडित मुलाच्या वडिलांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी 2 अल्पवयीन मुलांसह 4 जणांवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

ही मारहाणीची घटना पुण्यातील (Pune Crime) कोंढवा परिसरातील एका शाळेत घडली आहे. याठिकाणी वर्गाच्या मॉनिटरने काही विद्यार्थ्यांना हेयर कटिंग (Hair Cutting) करुन का आले नाहीत ? अशी विचारणा केली. याच कारणावरुन विद्यार्थ्यांनी मॉनिटरला बेल्ट (Belt) आणि लाकडी बांबूने (Wooden Bamboo) मारहाण केली. या प्रकरणी कोंढावा पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. ओवेज कैफ Ovej Kaif (वय – 18) असं आरोपीचे नाव असून अन्य तीन आरोपी अल्पवयीन आहेत.

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मुलं कोंढवा परिसरातील एका शाळेत इयत्ता आठवीच्या वर्गात शिकत आहेत. तर पीडीत मुलगा वर्गाचा मॉनिटर आहे. 27 मार्च रोजी मॉनिटरने वर्गातील दोन विद्यार्थ्यांना सर्वांसमोर तुम्ही कटिंग करुन का आले नाहीत ? अशी विचारणा केली. याचा राग मनात धरुन आरोपी मुलांनी मॉनिटरला शिवीगाळ करत दमदाटी केली. ते एवढ्यावरच थांबले नाही.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

आरोपींनी शाळा सुटल्यानंतर पीडीत मॉनिटरला इतर मित्रांच्या मदतीने बेदम मारहाण केली. आरोपींनी कंबरेच्या बेल्ट आणि लाकडी बांबूने मारहाण केली. या मारहाणीत मुलगा गंभीर जखमी झाला आहे. मारहाणीचा हा धक्कादायक प्रकार समजल्यानंतर, पीडित मुलाच्या वडिलांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | after asking about hair cut student beat class monitor kondhwa pune

 

हे देखील वाचा :

Alia Bhatt Viral News | लग्नाच्या काही दिवसांपूर्वी आलियानं उचललं टोकाचं पाऊल, तिच्यासोबत झाला मोठा विश्वासघात

LIC Jeevan Saral Pension | ‘या’ योजनेत करा गुंतवणूक अन् निवृत्तीनंतर मिळवा ‘इतकी’ पेन्शन; जाणून घ्या स्कीम

Aadhaar-PAN Link | ‘या’ व्यक्तींसाठी आधार पॅनशी लिंक करण्याची आवश्यकता नाही; जाणून घ्या सविस्तर

Gas Cylinder Blast in Pune | पुण्यातील कात्रज परिसरात एका पाठोपाठ एक असे अनेक गॅस सिलेंडरचे स्फोट; परिसरात खळबळ

 

Related Posts