IMPIMP

Pune Crime | बंडगार्डन आणि फरासखाना पोलीस ठाण्यच्या हद्दीत अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई, मॅस्केलाईन आणि एमडी जप्त

by nagesh
Pune Crime News | Tanzanian national arrested by crime branch for drug trafficking again on bail; 7 lakh worth of cocaine seized

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   Pune Crime | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) अंमली पदार्थ विरोधी पथक दोनने
(Anti Narcotics Cell) फरासखाना आणि बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच दिवशी दोन मोठ्या कारवाया केल्या आहेत. या कारवाईत
पोलिसांनी 76 हजार रुपये किमतीच्या मॅस्केलाईन या अंमली पदार्थाच्या गोळ्या (Mascaline Narcotic Tablets) आणि 2 लाख रुपये किमतीचा
मेफेड्रॉन Mephedrone (एम.डी. M.D.) हा अंमली पदार्थ जप्त (Pune Crime) केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अंमली पदार्थ विरोधी पथक गुरुवारी (दि.10) फरासखाना पोलीस ठाण्याच्या (Faraskhana Police Station) हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी पोलिसांना बुधवार पेठेतील सार्वजनिक रोडवर उभा असलेल्या व्यक्तीकडे अंमली पदार्थाच्या गोळ्या असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून जाहिदुल मोतेहर मलीक उर्फ आकाश मंडल (वय-24 रा. भोई गल्ली, बुधवार पेठ) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 76 हजार रुपये किमतीच्या 38 ग्रॅम मॅस्केलाईन या अंमली पदार्थाच्या 38 गोळ्या आणि 10 हजार रुपये किमतीचा मोबाईल जप्त केला. आरोपीविरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. अॅक्ट (NDPS Act) नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण (PSI Digambar Chavan) करीत आहेत.( Pune Crime)

 

बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या (Bund Garden Police Station) हद्दीमध्ये दोन जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 2 लाख रुपये किमतीचे 10 ग्रॅम मेफेड्रॉन जप्त करण्यात आले. तसेच गुन्ह्यात वापरलेली 40 हजार रुपये किमतीची मोपेड आणि 20 हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल असा एकूण 2 लाख 60 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी अलफहाद वजीर सय्यद (वय-27 रा. कॅम्प, पुणे), शाहरुख बाबु शेख (वय-29 रा. सनश्री क्राऊन, कोंढवा) यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या विरुद्ध बंडगर्डन पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक गावडे (PSI Gawde) करीत आहेत.

 

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णीक (Jt CP Joint Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 2 नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे (Police Inspector Sunil Thopte) , पोलीस उपनिरीक्षक एस.डी. नरके (PSI S.D. Narke),
पोलीस अंमलदार नितीन जगदाळे, साहिल शेख, आझीम शेख,
संतोष देशपांडे, संदिप जाधव, प्रशांत बोमादंडी, रविंद्र रोकडे, मयुर सुर्यवंशी, चेदन गायकवाड, योगेश मांढरे,
युवराज कांबळे, दिनेश बास्टेवाड व महिला पोलीस अंमलदार दिशा खेवलकर यांच्या पथकाने केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime | Anti-narcotics squad in major operation in Bundagarden and Faraskhana police station limits, Mascaline and MD seized

 

हे देखील वाचा :

Yashomati Thakur | अफवा पसरविणे भाजपचे काम आहे, स्वातंत्र्यांच्या काळात देखील ते तेच करत होते – यशोमती ठाकूर

Uddhav Thackeray | “केंद्रीय यंत्रणा केंद्र सरकारच्या पाळीव…”; राऊतांच्या भेटी नंतर उद्धव ठाकरेंचे वक्तव्य

Chitra Wagh | ‘एखाद्या महिलेचा अपमान म्हणजे…; भाजपच्या चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंना टोला

 

Related Posts