IMPIMP

Pune Crime | नववर्षाच्या सुरुवातीला कोथरुड, सिंहगड रस्ता परिसरात घरफोड्या, 64 लाखांचा ऐवज लंपास

by nagesh
Pune Crime | At the beginning of the new year, house burglaries in the area of Kothrud, Sinhagad road, 64 lakhs of compensation was lost.me | Went to dinner and thieves cleaned the house, 66 lakh house burglary in broad daylight in elite society of Baner area

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन Pune Crime | सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पुणेकर मग्न असताना चोरट्यांनी घरातील मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारत पुणेकरांना नवीन वर्षाचे गीफ्ट दिले आहे. चोरट्यांनी कोथरुड, सिंहगड रस्ता परिसरातील घरांमध्ये घरफोडी (Burglary) करुन तब्बल 64 लाखांचा ऐवज चोरून नेला. कोथरुडमध्ये व्यावसायिकाच्या घराचे कुलुप तोडून चोरट्यांनी कपाटातील दागिने (Jewellery), रोकड (Cash) असा एकूण 41 लाख 16 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. तर सिंहगड रस्ता परिसरात झालेल्या घरफोडीमध्ये चोरट्यांनी बंगल्यातून 23 लाख 53 हजार 800 रुपयांचा ऐवज (Pune Crime) चोरून नेला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत चंद्रशेखर केसरीनाथ चौधरी Chandrasekhar Kesarinath Chaudhary (वय-79 रा. रामबाग कॉलनी, शिवसाई केसरी अपार्टमेंट)) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे व्यावसायिक असून त्यांची वाहनांना लागणारे दिवे तयार करण्याची कंपनी आहे. कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये (Lockdown) त्यांची कंपनी बंद झाली. चोरट्यांनी चौधरी यांच्या फ्लॅटचे कुलुप तोडून घरात प्रवेश केला. कपाटात ठेवलेले 32 लाख 5 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, 7 लाख 10 हजार रुपयांचे हिरेजडित दागिने (Diamond Jewellery) आणि दोन लाख रुपये रोख असा एकूण 41 लाख 16 हजार 798 रुपयांचा ऐवज चोरून नेला. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील (Senior Police Inspector Hemant Patil) करीत आहेत.

 

सिंहगड रस्ता परिसरातील धायरी येथे एका फ्लॅटचे कुलुप तोडून चोरट्यांनी कपाटातील सोन्याचे दागिने,
रोख रक्कम असा एकूण 23 लाख 53 हजार 800 रुपयांचा ऐवज चोरुन नेला.
याबाबत आशिष अंकुश पासलकर (वय-33 रा. पार्थ संकुल, गणेशनगर, धायरी)
यांनी सिंहगड रस्ता पोलीस (Sinhagad Road Police) ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी यांचे पार्थ संकुल सोसायटीमध्ये रो हाऊस आहे.
चोरट्यांना बंगल्याचे कुलुप तोडून घरातील कपाटात ठेवलेले दागिने, रोख रक्कम चोरुन नेली.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम (API Sachin Nikam) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | At the beginning of the new year, house burglaries in the area of Kothrud, Sinhagad road, 64 lakhs of compensation was lost.

 

हे देखील वाचा :

CM Bhagwant Mann | पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या निवास्थानाजवळ आढळला बॉम्ब; प्रचंड खळबळ

Malaika Arora | अभिनेत्री मलायका अरोराला अर्जुनसोबतच्या ‘त्या’ फोटोवरून नेटकऱ्यांनी केले ट्रोल

Alia Bhatt | “…म्हणून मी गरोदर असल्याचं सगळ्यांपासून लपवलं”, आलिया भट्टने केला मोठा खुलासा

 

Related Posts