IMPIMP

Pune Crime | कट मारल्याच्या कारणावरुन तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न; मुंढव्यातील बंधारा रोडवरील घटना

by nagesh
Chhatrapati Sambhajinagar Crime News | lodge owner and his son were brutally beaten up by mob for not allowing them to go to the toilet vaizapur

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  –  Pune Crime | रस्त्यावरुन जाताना कट मारल्याच्या कारणावरुन तिघांनी तरुणाच्या डोक्यात दगड घालून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) केला. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी (Pune Police) आदि रईस मलिक Adi Raees Malik (वय १८, रा. बीडी कामगार वसाहत, चंदननगर) आणि निखिल सुभाष दरेकर Nikhil Subhash Darekar (वय १९, रा. अष्टविनायक नगर, चंदननगर) यांना अटक केली आहे.

 

याबाबत बशीर तांबोळी Bashir Tamboli (वय ४६, रा. केशवनगर, मुंढवा) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३९८/२२) दिली आहे. ही घटना जुना मुंढवा बंधारा रोडवर मंगळवारी रात्री नऊ वाजता घडली. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा सोहेल तांबोळी (Sohail Tamboli) हा
जेवणाचा डब्बा घेऊन दुचाकीवरुन जात होता. त्यावेळी समोरुन दुचाकीवर ट्रिपल सीट आलेल्यांनी त्याच्या
दुचाकीला कट मारला. तेव्हा त्याने “अरे गाडी बघून सावकाश् चालव,” असे बोलला.
यावरुन आरोपीने फिर्यादीचे दुचाकी पुढे गाडी आडवी घालून शिवीगाळ केली.
त्यांच्यातील एकाने “याला धरा इथेच याला ठार करु,” असे म्हणून जीवे ठार करण्याच्या उद्देशाने सोहेल
याच्या डोक्यात दगड घालून डोके फोडले. दुसर्‍याने दगड तोंडावर मारल्याने त्याचे पुढचे दोन दात पडून तो
गंभीर जखमी झाला आहे. सहायक पोलीस निरीक्षक कांबळे (Assistant Police Inspector Kamble) अधिक तपास करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  Pune Crime | Attempt To Kill Murder In Mundhwa Area Of Pune

 

हे देखील वाचा :

Pune Crime | किरकोळ कारणावरून खुनाचा प्रयत्न, लोहगाव परिसरातील घटना

Har Har Mahadev | “‘हर हर महादेव’ चित्रपट बाबासाहेब पुरंदरेंनी लिहिला का?” आंनद दवेंची जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका

T20 World Cup | रोहित शर्मा इंग्लंडविरुद्ध सेमीफायनलमध्ये खेळणार की नाही? दिली ‘हि’ मोठी अपडेट

 

Related Posts