IMPIMP

Covid-19 | जगातील सर्वात विषारी साप वाचवणार मनुष्याचा जीव, कोरोना व्हायरसविरूद्ध ’रामबाण’ ठरले विष

by nagesh
Covid-19 | brazilian viper venom may become medicine in fight against covid 19 research in brazil found

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Covid-19 | कोरोना व्हायरसविरूद्ध अनेक व्हॅक्सीन आल्या असल्या तरी अजूनपर्यंत कोणतेही परिणामकारक औषध तयार झालेले नाही. परंतु, पहिल्यांदा असे वाटत आहे की, कोरोना व्हायरसविरूद्ध जीवरक्षक औषध बनवण्याच्या अगदी जवळ शास्त्रज्ञ पोहचले आहेत. ब्राझीलमधील संशोधनातून समजले आहे की, जगातील सर्वात विषारी सापामध्ये एक असा अणू आहे, जो कोरोना व्हायरसला (Covid-19) रोखण्यात यशस्वी झाला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

विषापासून जीवरक्षक औषध

ब्राझीलच्या संशोधकांनी शोध लावला आहे की, एक विशिष्ट जातीच्या सापाच्या विषातातील एका अणुने माकडाच्या पेशींमध्ये कोरोना व्हायरसचे प्रजनन रोखले आहे, जे कोविड -19 मुळे व्हायरसला तोंड देण्यासाठी एका औषधाकडे संभाव्य पहिले पाऊल ठरू शकते. या महिन्यात सायन्स मॅगझिन मोलेक्यूल्समध्ये प्रकाशित एका रिसर्चमध्ये दावा करण्यात आला आहे की, जराकुसु पिट वायपर (Xaraxu Pit Viper)
सापाच्या विषात एक असा अणु आहे, जो कोरोना व्हायरसला रोखण्यात यशस्वी ठरत आहे . ( Xaraxu Pit Viper snake venom contains a
molecule that is successful in preventing the corona virus). माकडांवर शास्त्रज्ञांनी जेव्हा संशोधन केले, तेव्हा आढळले की, माकडामध्ये 75
टक्के कोरोनाला रोखण्यात सापाच्या विषातील हा अणू अपयोगी आहे. ज्यानंतर शक्यता निर्माण झाली आहे की, लवकरच जगासमोर कोरोना
व्हायरसवर विष मिळेल.

 

 

 शास्त्रज्ञांनी काय म्हटले?

साओ पावलो विद्यापीठाचे प्रोफेसर आणि या रिसर्चचे लेखक राफेल गुइडो (Raphael Guido) यांनी म्हटले की, आम्ही रिसर्चच्या दरम्यान पाहिले की, सापाच्या विषातील एक घटक व्हायरसच्या एका महत्वाच्या प्रोटीनला रोखण्यात सक्षम ठरला आहे.

प्रोफेसर राफेल यांनी म्हटले की, सापाच्या विषातील अणु एक पेप्टाईड म्हणजे अमीनो अ‍ॅसिडची श्रृंखला आहे, जी झङझीे नावाच्या कोरोना व्हायरसच्या एका इंजाइमसोबत जोडला जातो, ज्यानंतर कोरोना व्हायरस शरीरात प्रतिकृती बनवने बंद करतो. आगामी काळात हा प्रयोग मनुष्यावर केला जाऊ शकतो.

त्यांनी म्हटले, सोप्या शब्दात सांगायचे तर सापाच्या विषातील अणु त्या प्रोटीन पेशींना निष्क्रिय करतो, जो कोरोना व्हायरसच्या वेगाने विस्तारास जबाबदार असतो.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

विषाला औषध समजण्याची चूक करू नये

हे संशोधन प्रसिद्ध झाल्यानंतर आता शंका ही व्यक्त केली जात आहे की, ब्राझीलमध्ये आढळणार्‍या जराकुसु
पिट वायपर सापाची लोक मोठ्या प्रमाणात शिकार करण्यास सुरूवात करू शकतात. यामुळे शास्त्रज्ञांनी स्पष्ट
केले आहे की, सापाचे विष औषध नाही आणि सापाच्या विषाने कोरोना बरा होऊ शकत नाही, उलट सापाचे
विष मनुष्याचा जीव घेऊ शकते.

शास्त्रज्ञांनी म्हटले की, सापाच्या विषातील अणु शास्त्रीय पद्धतीने काढून त्यापासून औषध बनवण्याची शक्यता
आहे आणि औषध बनवण्याच्या द़ृष्टीने काम सुरू आहे. जराकुसु पिट वायपर जगातील सर्वात धोकादायक
सापापैकी एक आहे, जो ब्राझीलच्या एका आयलँडवर आढळतो. हा साप सुमारे 6 फुट लांब असतो आणि खुप
धोकादायक असतो.

 

Web Title : Covid-19 | brazilian viper venom may become medicine in fight against covid 19 research in brazil found

 

हे देखील वाचा :

Pune Crime | जातपंचायतीतून घटस्फोट का घेतला नाही म्हणून कुटुंबाला टाकलं वाळीत; 14 जणांवर FIR

Earn Money | अवघ्या 5 हजार रुपयात सुरू करा ‘हा’ बिझनेस, दरमहिना होईल लाखो रूपयांची कमाई !

Pune Crime | खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्याकडून गोळीबार, केक शॉपमध्ये केला चोरीचा प्रयत्न

 

Related Posts