IMPIMP

Pune Crime | पुण्यातील भाजप प्रवक्त्याला मारहाण, राष्ट्रवादीच्या 4 जाणांविरुद्ध FIR

by nagesh
 Pune Crime News | A case has been filed against the moneylender who demanded 55 thousand even after returning 2.5 lakh on 50 thousand, FIR in Chandannagar police station

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | भाजपचे (BJP) प्रवक्ते विनायक आंबेकर (Vinayak Ambekar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष
शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्या विरोधात एक पोस्ट टाकली होती. याचा जाब विचारत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कार्यकर्त्यांनी
शनिवारी आंबेकर यांच्या कार्यालयात घुसून मारहाण (Beating) केली होती. या प्रकरणी (BJP Spokesperson Beaten Case) पुण्यातील खडक
पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी (Pune Police) राष्ट्रवादीच्या चार कार्यकर्त्यांविरुद्ध
भारतीय दंड संहिता 1860 अन्वये कलम 504,323 अंतर्गत अदखलपात्र गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) आणि भाजप यांच्यामध्ये दररोज होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपाने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर यांनी शरद पवार यांच्या विरोधात पोस्ट केल्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली (Pune Crime). त्यामुळे मुद्यावरुन सुरु झालेला वाद आता गुद्यावर आल्याचे पहायला मिळत आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंबेकर यांच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishrambag Police Station) तक्रार नोंदवली आहे.

 

आंबेकर यांनी फेसबुकवर (Facebook Post) शरद पवार यांच्या विरोधात पोस्ट केल्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना मारहाण केली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला होता. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप एकालाही अटक करण्यात आलेली नाही.

 

 

दरम्यान, भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यालयात घुसून मारहाण केल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी या घटनेचा निषेध केला. तसेच आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या चार जणांविरुद्ध खडक पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title : Pune Crime | BJP spokesperson beaten in Pune, FIR against 4 NCP workers

 

हे देखील वाचा :

Anna Hazare | लोकायुक्त कायद्यासाठी अण्णा हजारे पुन्हा मैदानात

Mumbai Police | पोलीस निरीक्षकाचे CP संजय पांडे यांना पत्र; म्हणाले…

Devendra Fadnavis | त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांचे वजन खरंच 128 किलो होते?

CNG Price Hike | सीएनजी गॅसच्या दरात 2 रुपयांची वाढ; जाणून घ्या मुंबई, पुणे, नागपूरसह देशातील प्रमूख शहरातील दर

 

Related Posts