IMPIMP

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यातील रास्ता पेठेत महाविद्यालयीन तरुणाला बेदम मारहाण; ब्लेडनं कापल्या भुवया, प्रचंड खळबळ

by nagesh
Pune Crime | incident of attack on a school boy by a goon in kothrud area

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | पुणे शहरात एक विचित्र घटना समोर आली आहे. पुण्यातील (Pune Crime) एका 17 वर्षीय
महाविद्यालयीन तरुणासोबत (College Youth) दोघांनी अघोरी कृत्य केलं आहे. आरोपींनी तरुणाला रास्ता पेठेतील (Rasta Peth) महात्मा फुले
चौकात (Mahatma Phule Chowk) भेटायला बोलून त्याला शिवीगाळ करुन मारहाण (Beating) केली. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी जबरदस्तीने तरुणाच्या भुवया (Cut Eyebrow) ब्लेडने कापल्या. याप्रकरणी पीडित तरुणाच्या वडिलांनी समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) फिर्याद दिली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

समर्थ पोलिसांनी आरोपींविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. रिझवान खलिल Rizwan Khalil (रा. कागदीपुरा, कसबा पेठ Kasba Peth) आणि त्याचा साथिदार साहिल कुरेशी (Sahil Qureshi) असे गुन्हा (FIR) दखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. घटनेनंतर दोन्ही आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 वर्षीय पीडित तरुण पुण्यातील (Pune Crime) एका महाविद्यालयात शिक्षण घेतो. घटनेच्या दिवशी तो क्लासला जात होता. त्यावेळी आरोपी खलिल आणि कुरेशी यांनी संबंधित मुलाला फोन केला. तसेच तुझं शिकवणी वर्गात काय भानगड सुर आहे, हे आम्हाला माहीत आहे. तू महात्मा फुले चौकात ये आपण प्रकरण मिटवू असं सांगितलं. त्यानुसार पीडित तरुण रास्ता पेठेतील महात्मा फुले चौकात आरोपींना भेटण्यासाठी गेला.

 

 

त्याठिकाणी आरोपींनी तरुणाला धमकावून त्याला शिवीगाळ केली. तसेच मारहाण केली. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर साथीदार कुरेशे याने तरुणाचे हात पकडले तर खलिल याने ब्लेडने (Blade) तरुणाच्या भुवया कापल्या. हा धक्कादायक प्रकार केल्यानंतर आरोपी फरार झाले. मुलासोबत घडलेला प्रकार समजल्यानंतर पीडित तरुणाच्या वडिलांनी समर्थ पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title : Pune Crime | Charges filed against four persons for setting shop on fire due to misunderstanding; Incidents in Hadapsar area

 

हे देखील वाचा :

Nilesh Rane | भाजप नेते निलेश राणे यांच्यावर FIR

MLA Nitesh Rane | आमदार नितेश राणेंना आणखी एक झटका, मुंबई हायकोर्टानं दिले महत्वाचे आदेश

Pune Crime | गैरसमजातून दुकान पेटवून देणार्‍या चौघांवर गुन्हा दाखल; हडपसर परिसरातील घटना

Corporator Keshav Gholve | खंडणी प्रकरणी माजी उपमहापौर आणि भाजपाचे विद्यमान नगरसेवक केशव घोळवे यांच्यासह तिघांना मध्यरात्री अटक

 

Related Posts