IMPIMP

Pune Crime | सरकारकडून शैक्षणिक फीचे पैसे परत मिळवून देण्याचे आमिष दाखवून 250 हून अधिक जणांची फसवणूक; तिरुपती कॉर्पोरेशनच्या विकास बांदल, कॅशियर विलास पाटीलवर गुन्हा दाखल

by nagesh
Pune Crime News | Pune Crime News : Bharti Vidyapeeth Police Station - Fraud of crores with the lure of excess return on investment without an investment policy

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | सरकारकडून शैक्षणिक फीचे (Education Fees) पैसे परत मिळवून देतो तसेच व्यवसायासाठी कर्ज (Business Loan) मिळवून देतो, अशी विविध कारणे सांगून सुमारे अडीचशेहून अधिक लोकांची २० लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक (Fraud Case) केल्याचा प्रकार समोर (Pune Crime) आला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी (Sinhagad Road Police) तिरुपती कॉर्पोरेशनचा (Tirupati Corporation) संचालक विकास रघुनाथ बांदल (Vikas Raghunath Bandal) (वय ३५, रा़. नर्‍हे आंबेगाव) आणि कॅशियर विलास वामन पाटील (Vilas Waman Patil) यांच्यावर गुन्हा दाखल (FIR) केला आहे.

 

याप्रकरणी रवींद्र हरीश्चंद्र जाधव (Ravindra Harishchandra Jadhav) (वय ४९, रा. बिबवेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार नोव्हेंबर २०२० ते डिसेंबर २०२१ दरम्यान कात्रज बायपास रोडवरील (Katraj Bypass Road) ओमकार नंदन इमारतीत घडला.

 

पिपंरी चिंचवड पोलिसांनी (Pimpri Chinchwad Police) विकास बांदल याला अटक (Arrest) केल्यानंतर आता त्याचे एक एक कारनामे बाहेर येत आहेत.

 

विकास बांदल याने ओमकार नंदन इमारतीत कार्यालय थाटले होते. केंद्र सरकारची (Central Government) शैक्षणिक फी परत करण्याची योजना आहे,
असे सांगून जाधव यांना आपल्या जाळ्यात ओढले.
त्यांना फ्रेंचायजी (Franchise) घेण्यास भाग पाडले.
सरकारकडून विद्यार्थ्यांचे फीचे पैसे मिळवून देतो, असे सांगितले.
जाधव यांनी डिपॉझिट म्हणून ३ लाख ८५ हजार रुपये दिले. तसेच ३१ विद्यार्थ्यांकडून १ लाख ९१ हजार ३६० रुपये दिले.
फिर्यादीचे मुलांची शैक्षणिक फि माफ होण्यासाठी ९ हजार ९६० रुपये दिले होते.
अनेक महिने वाट पाहिल्यानंतरही त्याने फी मिळवून दिली नाही़ तसेच त्यांचे डिपॉझिट म्हणून दिलेले पैसे परत करण्यासाठी चेक दिला.
तो बँकेत पैसे नसल्याने परत आला.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

विकास बांदल याने बिबवेवाडी (Bibvewadi) येथील बेटी आशा केंद्र (Beti Asha Kendra) यांच्यामार्फत १५९ महिला व पुरुषांकडून भरलेली  शैक्षणिक  फी परत मिळवून देतो, असे सांगून प्रत्येकाकडून ५ हजार ९८० रुपये असे एकूण ९ लाख ५० हजार ८२० रुपये घेतले.
गरीब व गरजु महिलांना व्यवसायासाठी प्रत्येकी १ लाख रुपये कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्याच संस्थेतील ७० ते ८० महिलांकडून २ लाख ६२ हजार ५०० रुपये घेतले.
कोणालाही शैक्षणिक फी ची रक्कम तसेच कर्ज मिळवून न देता सर्वांची मिळून २० लाख ६८ हजार ५१० रुपयांची फसवणूक (Pune Crime) केली.
गेल्या काही दिवसांपासून विकास बांदल हा फरार झाला होता. (Cheating Case)

 

त्याने आकुर्डी (Akurdi) येथे अशाच प्रकारे कार्यालय स्थापन करुन तेथेही शैक्षणिक फी परत मिळवून देतो, कर्ज मिळवून देतो,
तसेच कोवीड – १९ मुळे मृत्यु (Covid-19 Death) पावलेल्यांच्या नातेवाईकांना ५० हजार रुपयांची मदत मिळवून देतो,
अशी वेगवेगळी कारणे सांगून लोकांकडून पैसे घेऊन लाखो रुपयांचा गंडा घातला होता.
निगडी पोलीस ठाण्यात (Nigdi police station) याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.
निगडी पोलिसांनी विकास बांदल याचा शोध घेऊन त्याला शहापूर टोल नाक्यावर (Shahapur Toll Naka) काही दिवसांपूर्वी अटक केली होती.
त्यानंतर आता त्याने फसवणूक केलेले लोक पुढे येत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Cheating more than 250 people by offering them a refund of tuition fees from the government Case filed against Vikas Bandal and Cashier of Tirupati Corporation

 

हे देखील वाचा :

Bombay High Court | कायदेशीरदृष्ट्या पहिला विवाह समाप्त केल्याशिवाय दुसर्‍या पत्नीला पतीच्या पेन्शनचा हक्क नाही, मुंबई हायकोर्टाचा निर्णय

Pune Crime | आई-वडिल जादुटोणा करत असल्याच्या संशयाने विवाहिताचा छळ; महिलेच्या आत्महत्येच्या प्रकरणात पतीला अटक

Corona Restrictions in India | केंद्राचे सर्व राज्यांना पत्र ! कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन अनावश्यक निर्बंध दूर करा

Pune Crime | पुण्यात 24 वर्षीय तरुणीवर बलात्कार, गर्भपात केल्याप्रकरणी रघुनाथ कुचिक याच्यावर गुन्हा दाखल

 

Related Posts