IMPIMP

Pune Crime | आई-वडिल जादुटोणा करत असल्याच्या संशयाने विवाहिताचा छळ; महिलेच्या आत्महत्येच्या प्रकरणात पतीला अटक

by nagesh
Pune Crime News | Innkeeper who stole from PMPML bus arrested, valuables seized

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | आई वडिल जादुटोणा करतात, त्यामुळे मला यश येत नाही, असा संशय घेऊन विवाहितेला मारहाण करुन छळ केला जात होता. या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या (Married Woman Suicide) केली. दत्तवाडी पोलिसांनी (Dattawadi Police) पतीला अटक केली आहे. (Pune Crime)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

अतुल गोरख साळवे (रा. जनता वसाहत, पर्वती) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे. सुनिता साळवे आणि आकाश साळवे (रा. जनता वसाहत, पर्वती) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कविता अतुल साळवे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. (Pune Crime)

याप्रकरणी प्रकाश त्रिंबक तायडे (वय ६०, रा. चांगेफळ, बुलढाणा) यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात (Dattawadi Police Station) फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी कविता हिचा विवाह अतुल गोरख साळवे यांच्याशी झाला होता. लग्न झाल्यापासून तिचा सासरी छळ होत होता. तुझ्यासोबत लग्न झाल्यामुळे माझे वाटोळे झाले. तुला घरातील काम करता येत नाही. तुझे वडील जादु टोणा करतात. त्यामुळे मला यश येत नाही, असे बोलून तो तिच्याशी वाद घालून मारहाण करीत असे़ या शारिरीक व मानसिक छळाला कंटाळून कविता हिने २ फेब्रुवारी रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्यावर अंत्यसंस्कार व अन्य विधी केल्यानंतर तिच्या वडिलांनी फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक खरात अधिक तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | Harassment of a married woman on suspicion of practicing witchcraft; Husband arrested in woman’s suicide case

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यात 24 वर्षीय तरुणीवर बलात्कार, गर्भपात केल्याप्रकरणी रघुनाथ कुचिक याच्यावर गुन्हा दाखल

Pune Amenity Space | भाजपने बहुमताच्या जोरावर वडगाव शेरीतील अ‍ॅमिनीटी स्पेस बिल्डरच्या घशात घातली ! राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी अ‍ॅन्टी करप्शनकडे तक्रार करणार

Pune Crime | अनैतिक संबंधातून महिलेचा गळा आवळून खून, मृतदेह बाथरुममध्ये टाकून फरार झालेल्या आरोपीच्या विमानतळ पोलिसांनी बिहारमधून आवळल्या मुसक्या

Shivajirao Adhalrao Patil | खा. अमोल कोल्हे यांच्या घोडेस्वारीवर शिवाजीराव आढळराव पाटलांचा निशाणा; म्हणाले…

Sanjay Raut | ‘माझा कोणाच्या खुर्चीवर डोळा नाही तर…’; संजय राऊतांचं राणेंना प्रत्युत्तर

 

Related Posts