IMPIMP

Pune Crime | भोसरीत बेदम मारहाण करुन महिलेचा विनयभंग, 4 जणांवर FIR

by nagesh
Pune Gang Rape | Gang-rape of woman with sedation spray; Sensational incident in Kondhwa area

भोसरी : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | दरवाजात सिमेंटचे ब्लॉक, दगडी, विटा आणि लाकडे का टकतो, असा जाब विचारणाऱ्या महिलेला बेदम मारहाण (Beating) करुन विनयभंग (Molestation) केल्याची घटना भोसरी पोलीस ठाण्याच्या (Bhosari Police Station) हद्दीत घडली आहे. पोलिसांनी अक्षय संजय अग्रवाल (Akshay Sanjay Agarwal), संजय ज्वारीमल अग्रवाल Sanjay Jwarimal Agarwal (वय-52) आणि दोन महिला (सर्व रा. भोसरी) यांच्याविरुद्ध आयपीसी 392, 354, 354 (ब), 323, 504, 506, 509, 34 नुसार गुन्हा (FIR) दाखल (Pune Crime) केला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याबाबत पीडित महिलेने सोमवारी (दि.26) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.21) रात्री 9 ते 10 च्या दरम्यान पीडित महिलेच्या घरासमोर घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिमेंटचे ब्लॉक (Cement Block), दगड, विटा, लाकडे आमच्या दारवाजात का टकतो असे, फिर्यादी महिलेने विचारले. त्यामुळे आरोपी अक्षय याने अश्लील हावभाव करुन फिर्यादीस शिवीगाळ केली. आरोपी अक्षय याच्या आई आणि बहिणीने फिर्यादीस मारहाण केली.(Pune Crime)

 

फिर्यादी यांचे पती भांडण सोडवण्यासाठी आले असता त्यांना सिमेंटचा ब्लॉक मारुन जखमी केले. संजय अग्रवाल याने गैरवर्तन करुन फिर्यादी महिलेचा विनयभंग केला. तसेच फिर्यादी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र (Gold Mangalsutra) जबरदस्तीने हिसकावले. मारहाण करुन आरोपी निघून गेल्यानंतर आरोपी अक्षय याच्या आईने फोन करुन केस मागे घे नाहीतर मी तुझ्यावर विनयभंगाची केस दाखल करीन, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भवारी (PSI Bhavari) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | FIR against 4 persons for molesting a woman by beating her to death in Bhosari

 

हे देखील वाचा :

Navneet Rana-Ravi Rana | राणा दाम्पत्याचा कोठडीतील मुक्काम वाढला; ‘या’ तारखेला होणार पुढील सुनावणी

Hair Spa Treatment Benefits | केसांना अधिक सुंदर अन् चमकदार बनवण्यासाठी घरीच करा हेअर स्पा; जाणून घ्या सोपी पद्धत

MP Navneet Rana | पोलीस कोठडीत हीन वागणूक दिल्याचा नवनीत राणांचा आरोप, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांनी स्पष्टच सांगितलं

 

Related Posts