IMPIMP

Hair Spa Treatment Benefits | केसांना अधिक सुंदर अन् चमकदार बनवण्यासाठी घरीच करा हेअर स्पा; जाणून घ्या सोपी पद्धत

by nagesh
Hair Spa Treatment Benefits | hair spa treatment simple steps to do a hair spa at home know benefits

सरकारसत्ता ऑनलाइन – Hair Spa Treatment Benefits | सध्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतो. आरोग्याबरोबरच आपण केस (Hair), चेहरा (Face) याकडे दुर्लक्ष करत असतो. आपणाला जशी आरोग्याची काळजी असते. तशीच काळजी आपल्या केसांचीही राखली पाहिजे (Hair Care Tips). विशेष म्हणजे महिलांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. काही महिलांच्या केसात कोंडा (Dandruff) होत असतो. अनेक उपाय केले तरी कोंडा जात नाही. त्यामुळे योग्य काळजी (Hair Spa Treatment Benefits) घेणे गरजेचे असते.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

केसांची निगा राखण्यासाठी आपण वेळोवेळी हेअर स्पा (Hair Spa) केले पाहिजे. हेअर स्पा म्हटलं की पहिल्यांदा पार्लरमध्ये जातात. मात्र, तेथे न जाता तुम्ही ही समस्या घरीच सोडवू शकता. अथवा स्पा घरीच करू शकता. तर मग 5 स्टेपमध्ये पार्लरसारखा हेअर स्पा घरी कसा करायचा? याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या (Tips For Healthy Hair). हा उपाय केल्याने तुमचे केस अगदी स्वच्छ आणि चमकदार बनतील. (Hair Spa Treatment Benefits)

 

1. केसांना तेल लावणे (Oil The Hair) –
आपण दररोज वापरत असाल ते केसांचे तेल कोमट करा. त्यानंतर केसांच्या मुळांना तेल अतिशय चांगल्या पद्धतीने लावा. त्यानंतर हलक्या हातांनी 15 ते 20 मिनिटे डोक्याला मसाज करा. दोन्ही हातांना तेल लावून गोलाकार पद्धतीने मसाज करा. मसाज केल्याने डोक्यातील रक्ताभिसरण चांगले होते, ज्यामुळे केस मजबूत आणि लांब (Hair Strong And Long) होतात.

 

2. केसांना स्टीम द्या (Let The Hair Steam) –
मसाज दिल्यानंतर केसांना वाफ द्या. वाफ येण्यासाठी गरम पाण्यात जाड कापूस किंवा अगदी जाड टॉवेलचाही वापर करू शकता. हे तुम्ही गरम पाण्यात भिजवून चांगले पिळून घ्या. यानंतर केसांना टॉवेल व्यवस्थित गुंडाळा. 10 मिनिटे आपल्या डोक्याभोवती गुंडाळून ठेवा. यामुळे केसांचे तेल मुळापर्यंत चांगले पोहोचते. आणि केसांना उत्तम स्टीम मिळते.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

3. केस स्वच्छ धुवून घ्या (Wash Hair Thoroughly) –
या सगळ्या प्रक्रियेनंतर केस स्वच्छ धुऊन घ्या. आता केस धुण्याकरता तुमचा रोजच्या वापरातील शाम्पू वापरा. केस धुण्यासाठी फक्त सामान्य पाणी वापरा. कोमट अथवा गरम पाण्याचा वापर केस धुण्यासाठी करू नका. यामुळे केसांना इजा होते. जर तुम्ही हिवाळ्यात हे करत असाल तर तुम्ही पाणी थोडे गरम करू शकता.

 

4. हेअर कंडिशनिंग (Hair Conditioning) –
केस स्वच्छ धुतल्यानंतर केसांना कंडिशनिंग अत्यंत महत्त्वाचं आहे. केसांना चांगल्या दर्जाचे कंडिशनर लावा.
पण कंडिशनर लावताना काळजी घ्या. तेला प्रमाणे कंडिशनर मुळांना लावायचे नाही.
ते मुळांपासून थोड्या वरच्या अंतरापासून लावायला सुरूवात करा. कंडिशनगर सगळ्या केसांना लावल्यानंतर 5 मिनिटांनी केस स्वच्छ धुवा.

 

5. हेअर मास्क (Hair Mask) –
हेअर कंडिशनिंग केल्यानंतर आता आपण हेअर स्पाच्या शेवटच्या टप्प्याकडे वळत आहेत. हेअर मास्क अत्यंत महत्वाची भूमिका बजावतं.
हेअर मास्कसाठी, एका भांड्यात एक पिकलेले केळे मॅश करा, नंतर त्यात मध आणि थोडे खोबरेल तेल घाला.
आता ते तुमच्या हलक्या ओल्या केसांवर हळूवरपणे लावा. हा हेअर मास्क 30 मिनिटे राहू द्या. त्यानंतर सौम्य शाम्पूने पुन्हा एकदा केस चांगले धुवा.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Hair Spa Treatment Benefits | hair spa treatment simple steps to do a hair spa at home know benefits

 

हे देखील वाचा :

MP Navneet Rana | पोलीस कोठडीत हीन वागणूक दिल्याचा नवनीत राणांचा आरोप, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांनी स्पष्टच सांगितलं

Sanjay Raut on Devendra Fadnavis | ‘हनुमान चालीसा पठण करणे गुन्हा आहे का?’; फडणवीसांच्या सवालावर संजय राऊतांचं उत्तर, म्हणाले…

Harmful Habits For Brain | ‘या’ रोजच्या 4 सवयी तुमच्या मेंदूला आतून पोकळ करतात; जाणून घ्या सविस्तर

 

Related Posts