IMPIMP

Sidharth Shukla | सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूचं कारण अस्पष्टच? मुंबई पोलीस म्हणाले…

by nagesh
Sidharth Shukla | sidharth shukla died mumbai police on sidharth shukla death

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन –  Sidharth Shukla | आज बाॅलीवुड क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. लोकप्रिय अभिनेता आणि बिग बॉस 13 (Bigg Boss) चा विजेता सिद्धार्थ शुक्लाचे (Sidharth Shukla) निधन (Died) झाले आहे. वयाच्या 40 व्या वर्षी सिद्धार्थने अखेरचा श्वास घेतला. त्याच्या निधनानंतर सर्वांना धक्का बसला असून चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जातेय. दरम्यान मुंबई पोलिसांनी या घटनेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. सिद्धार्थचा मृतदेह कूपर रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. आता हे सांगणं कठीण आहे की त्याचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला. अशी माहिती डीसीपींनी (DCP) दिली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

अधिक माहिती अशी की, मेडिकल आणि शवविच्छेदन केल्यानंतर त्त्याच्या रिपोर्टनंतर त्याचप्रमाणे सिद्धार्थसह राहणाऱ्यांचा जबाब नोंदवला जाईल, त्यानंतर यावर स्पष्ट काही सांगता येईल.
असं पोलीसांनी (Mumbai Police) सांगितलं आहे. तसेच, सूत्रांच्या माहितीनुसार, पोलीस या प्रकरणात अधिक तपास करत आहेत.
मेडिकल अहवाल आणि पोस्ट मॉर्टम रिपोर्ट (Post Mortem Report) समोर येईल आणि त्याचप्रमाणे त्याच्यासह राहणाऱ्यांचे जबाब नोंदवले जातील, मृत्यूचे कारण अजुन समजले नाही.
परंतु त्याच्या शरिरावर कोणतही बाह्य जखम नाही आहे.
सिद्धार्थ शुक्लाचा मृतदेह (Sidharth Shukla Died) शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
असं सुत्रांकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, साधारण 12.30 च्या सुमारास शवविच्छेदन केलं जाणार असे म्हटले जात आहे.
दरम्यान सिद्धार्थची बहिण तिचे पती रुग्णालयात दाखल झालेत.
तसेच मुंबई पोलीसांचं (Mumbai Police) पथक आणि SRPF ची तुकडी देखील कूपर रुग्णालयात (Cooper Hospital) पोहोचली आहे.
इतक्या कमी वयात मालिका, वेबसीरिज विश्वात सिद्धार्थने आपला ठसा उमटवला होता.
सिद्धार्थच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होते.

 

Web Title : Sidharth Shukla | sidharth shukla died mumbai police on sidharth shukla death

 

हे देखील वाचा :

Crime News | नगर परिषदेचा निलंबित अधिकारी निघाला ‘कुबेर’; 3 फ्लॅट, महागड्या गाड्या, 12 तास सुरु होता छापा

Pune MNS | ‘उघड दार उद्धवा आता…’, भाजपनंतर मनसेचं पुण्यात खुली करण्यासाठी आंदोलन

Pune Crime | चुलत भावाचा फोटो ‘डीपी’ला ठेवून तरुणाला 4 लाखांचा ‘गंडा’

 

Related Posts