IMPIMP

Pune Crime | ‘मी इथला भाई, कोणी मध्ये आले तर जिवंत सोडणार नाही’ ! खुनाचा बदला घेण्यासाठी तरुणावर कोयत्याने वार, हडपसर पोलिसांकडून सराईत गुन्हेगाराला अटक

by nagesh
Pune Crime News | Neighboring hoteliers beat up them for giving free soup on food

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | दोन वर्षांपूर्वी झालेल्या गुंडाच्या खूनाचा (Murder) बदला घेण्यासाठी गुंडाच्या टोळक्याने तरुणावर लोखंडी कोयत्याने सपासप वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Kill) केला आहे. ही घटना फुरसुंगी मधील गंगानगर येथे घडली (Pune Crime) असून याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Pune Police) सराईत गुन्हेगार (Criminal) राहुल पुटगे (Rahul Putge) याला अटक (Arrest) केली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याप्रकरणी श्रीकांत जगन्नाथ गायकवाड Shrikant Jagannath Gaikwad (वय – 32, रा. अष्टविनायक कॉलनी, गंगानगर, फुरसुंगी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी आकाश मोहन कांबळे (Akash Mohan Kamble), नुण्या शेख (Nunya Sheikh), राहुल पुटगे व इतर साथीदारांवर खूनाचा प्रयत्न (Attempted Murder) केल्याचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हे सर्व जण पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. पोलिसांनी राहुल पुटगे याला अटक केली आहे. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बश्या ऊर्फ बसवराज जयभीम कांबळे Bashya alias Basavaraj Jaybhim Kamble (वय 28, रा. अष्टविनायक कॉलनी, गंगानगर, फुरसुंगी, मुळ रा. कर्नाटक) हा आपल्या आईला कामाला सोडायला गेला असताना परत येताना पूर्ववैमनस्यातून गंगानगर येथील स्मशान भूमीजवळ अमोल शिंदे (Amol Shinde) व त्यांच्या साथीदारांनी खून केला होता. ही घटना 26 मे 2020 रोजी घडली होती.

 

फिर्यादी श्रीकांत गायकवाड यांचा खिडक्यांचे स्लायडिंग बनविण्याचा व्यवसाय आहे. बसवराज कांबळे हा त्यांच्याच गल्लीत राहत असल्याने त्यांच्या परिचयाचा होता. बसवराज  कांबळे याचा आतेभाऊ आकाश कांबळे Akash Kamble (वय 22, रा. गुरुदत्त कॉलनी, फुरसुंगी) हा तेव्हापासून फिर्यादी कडे खुन्नसने बघत असायचा. बसवराज याचा खून करणार्‍या मुलांमध्ये फिर्यादी यांचाही सहभाग आहे, असे त्याला वाटत होते. त्यातून तो फिर्यादीला घालून पाडून बोलायचा. फिर्यादीने त्याकडे दुर्लक्ष केले होते.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

फिर्यादी हे 7 जून रोजी दुपारी साडेबारा वाजता मोटारसायकलवरून कामाचे बिल आणण्यासाठी जात होते.
त्यावेळी समोरुन आकाश त्याच्या साथीदारांसह आला. त्याने फिर्यादी यांना अडविले.
आकाश याने कोयत्याने फिर्यादी यांच्या डोक्यावर वार केला. त्यामुळे ते खाली पडले.
इतरांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण (Beating) करण्यास सुरुवात केली. फिर्यादी यांचा आवाज ऐकून लोक मदतीला येऊ लागले.
तेव्हा आकाश याने हातामधील कोयता हवेमध्ये भिरकावून ‘मी इथला भाई आहे.
कोणी मध्ये आले तर त्याला जिवंत सोडणार नाही’, अशी धमकी (Threat) दिली. त्यामुळे लोक घाबरुन निघून गेले. फिर्यादी हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर हल्लेखोर कॅनॉलच्या दिशेने पळून गेले. नागरिकांना फिर्यादी यांना ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) दाखल केले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पोलीस उपनिरीक्षक ढावरे (PSI Dhaware) अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Hadapsar police arrest criminal in attempt to murder case

 

हे देखील वाचा :

Rajya Sabha Elections 2022 | महाविकास आघाडीला मोठा धक्का ! अनिल देशमुख, नवाब मलिकांना मतदानासाठी न्यायालयाचा नकार

Breast Cancer In Women | महिलांमध्ये वेगाने पसरत आहे स्तनाचा कॅन्सर, ‘या’ लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष; स्वताच करा ओळखा

Pune Municipal Corporation (PMC) | पुणेकरांना आता रस्त्यावर वाहन उभे करून शाॅपिंग करणं पडणार महागात

 

Related Posts