IMPIMP

Pune Crime | पत्नीचे प्रेमसंबंध प्रत्यक्ष पाहिल्याने पतीची आत्महत्या; पत्नीच्या प्रियकराने दिली होती जीवे मारण्याची धमकी

by nagesh
Aurangabad Crime | boyfriend sets himself on fire and hugs girlfriend incident in aurangabad

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | पत्नीचे प्रेमसंबंध (Love Affair) असल्याचे माहिती झाल्याने तो गावाकडून पुण्यात आला. तरीही तिचे प्रेमसंबंध चालूच राहिल्याचे त्याने प्रत्यक्ष पाहिले. पत्नीच्या प्रियकराने (Boyfriend) जीवे मारण्याची धमकी (Threats To Kill) दिल्याने पतीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी (Hinjewadi Police) अजिंक्य शिवाजी घुले Ajinkya Shivaji Ghule (रा. टाकळी, ता. केज, जि. बीड) याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

गणेश मिनीनाथ घुले Ganesh Mininath Ghule (वय २४, रा. नेरे दत्तवाडी, मुळ रा. टाकळी, ता. केज, जि. बीड) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

 

याबाबत त्यांची बहीण अनिता मिनीनाथ घुले Anita Mininath Ghule (वय २५, रा. घाटकोपर, मुंबई) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ९१२/२२) दिली आहे. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश याचा आश्विनी हिच्या बरोबर ७ जुलै २०२१ रोजी विवाह झाला होता. तो भांड्याचे दुकानात काम करीत होता. एक दोन वर्षे गावात राहिल्यानंतर जुलै २०२२ मध्ये तो आपली पत्नी आश्विनी हिला घेऊन आई वडिलांना काही एक न सांगता गावातून निघून पुण्यात राहण्यास गेला. फिर्यादी यांनी भावाला विचारल्यावर त्याने आपल्या पत्नीचे अजिंक्य घुले याच्याबरोबर प्रेमसंबंध असून तो गावात बदनामी करतो. त्याला जाब विचारल्यास त्याने जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरुन पुण्यास राहण्यास आलो असे त्याने फिर्यादीला सांगितले होते. पुण्यात तो स्विग्गीमध्ये डिलिव्हरी बॉय (Swiggy Delivery Boy) म्हणून काम करत होता. तो पुण्यात आल्यावर अजिंक्यही पुण्यात आला. १७ सप्टेंबर रोजी रात्री पावणे बारा वाजता तो घरी आला. तेव्हा त्याची पत्नी व अजिंक्य हे एकाच रुममध्ये होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

त्यावेळी त्यांच्यात भांडणे झाली. अजिंक्य घुले याने त्याला मारहाण (Beating) करुन तुझ्या बायकोबरोबर माझे
संबंध राहणार. तुला काय करायचे ते कर.
एक दिवस तुझा काटा काढून तुझ्या बायकोला मी घेऊन जाणार अशी जीवे मारण्याची धमकी त्याने गणेशला दिली.
ही घटना फिर्यादी यांना समजल्यावर त्यांनी अजिंक्य घुले याला फोन करुन विचारणा केल्यावर त्याने उडवाउडवीची
उत्तरे दिली. फिर्यादी या पुण्यात आल्या. गणेश याच्या पत्नीला घेऊन फिर्यादी मुंबईला गेल्या.
दुसर्‍या दिवशी त्यांनी गणेश याला फोन केला असता तो उचलत नव्हता.
त्यानंतर १९ सप्टेबर रोजी त्यांनी पुण्यातील एकाला गणेश फोन उचलत नसल्याचे सांगितले.
तेव्हा तो गणेशच्या रुमवर गेला. गणेश याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले.
त्यानंतर त्यांनी अंत्यविधी केल्यानंतर गुरुवारी फिर्याद दिली.
पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

 

 

Web Title :- Pune Crime | Husband’s suicide after witnessing his wife’s affair; The wife’s lover had threatened to kill her

 

हे देखील वाचा :

Hardeep Singh Puri | चंद्रपुरात पेट्रोलियम रिफायनरी स्थापन करणार; केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांची घोषणा

Pune Accident News | धक्कादायक! ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडून 6 महिन्यांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Pune Crime | उधारीचे पैसे मागितल्याने व्यावसायिकावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न; येरवडा परिसरातील घटना

 

Related Posts