IMPIMP

Pune Crime | पुण्यात वाईल्ड लाईफ फोटोग्राफरला बाणेर टेकडीवर लुबाडले, 2 जणांवर FIR

by nagesh
Pune Crime | after breakup karan anil rajput doing wrong things with girl family, hadapsar police arrrest him

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  पुण्यातील (Pune Crime) टेकडीवर फोटो काढण्यासाठी आलेल्या वाईल्ड लाईफ फोटोग्राफरला (Wildlife photographer) दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी लुबाडल्याची (Pune Crime) घटना समोर आली आहे. चोरट्यांनी फोटोग्राफरला धमकावून त्यांच्याकडील दोन कॅमेरे, लेन्स, सोन्याच्या अंगठ्या, रोख रक्कम, मोबाईल असा 1 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. ही घटना मंगळवारी (दि.17) दुपारी एकच्या सुमारास बाणेर पॅन कार्ड क्लब रोडजवळ (Baner Pancard Club Road) असलेल्या टेकडीवरील शिवमंदिराच्या पायथ्याशी घडली.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

याप्रकरणी वाईल्ड लाईफ फोटोग्राफर मुकुल मुखर्जी Mukul Mukherjee (वय- 40, रा. किर्ती एलिंगट, म्हाळुंगे, बालेवाडी) यांनी चतु:श्रृंगी पोलीस
ठाण्यात (Chaturshrungi police station) फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी 25 ते 30 वयोगटातील दोन अनोळखी आरोपींविरोधात गुन्हा
(FIR) दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुखर्जी हे वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करतात. मंगळवारी दुपारी
एकच्या सुमारास ते फोटोग्राफी करण्यासाठी बाणेर येथील टेकडीवर गेले होते. फोटोग्राफी करुन ते
टेकडीवर असलेल्या शिवमंदिराच्या पायथ्याशी आले. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या दोन जणांनी
मुखर्जी यांना धमावले. त्याच्याकडील कॅमेरा (Camera), लेन्स मोबाईल, ट्रायपॉड, सोन्याच्या
अंगठ्या (Gold ring), चांदीचे ब्रेसलेट व पाकीटातील चार हजार रुपयांची रोकड असा एकूण 1 लाख 80 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राजेश माळेगावे (Assistant Inspector of Police Rajesh Malegave) करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | In Pune, a wildlife photographer was robbed on Baner Hill, FIR was lodged against 2 persons

 

हे देखील वाचा :

Pune Crime | नोकरी देण्याच्या आमिषाने नागरिकांना 11 लाखांचा गंडा, एकावर FIR

Pune Crime | तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी 11 जणांवर लष्कर पोलीस ठाण्यात FIR

Patent Application | पेटंट अर्ज करणार्‍या सर्व शैक्षणिक संस्थासाठी शुल्कात 80% कपातीची घोषणा

Pune Crime | पुण्याच्या विमाननगर परिसरातून 14 लाखाचा गुटखा जप्त, दोघांवर कारवाई

 

Related Posts