IMPIMP

Pune Municipal Corporation (PMC) | पिचकारी बाहद्दरांवर वचक बसवण्यासाठी महापालिकेची कडक कारवाई, थुंकलेल्या ठिकाणाची करुन घेतली साफ-सफाई

by nagesh
Pune Municipal Corporation (PMC) | Strict action of the Municipal Corporation to prevent the spitting, cleaned the place where spitting was done

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Municipal Corporation (PMC) | पुणे शहरामध्ये 16 आणि 17 जानेवारी रोजी जी-20 परिषद होणार आहे. या परिषदेसाठी परदेशातून लोक येणार आहेत. परदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी महानगरपालिकेकडून (Pune Municipal Corporation (PMC) शहरात रंगरंगोटी आणि सुशोभीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र बेशिस्त नागरिकांकडून रंगरंगोटी करण्यात आलेल्या भींतीवर, रस्त्यावर पिचकाऱ्या (Spit Public Places) मारल्या जात आहे. सार्वजनिक ठिकाणी पिचकारी मारणाऱ्यांवर महापालिकेडून कडक कारवाई केली जात आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

वॉल पेंटिंग व सुशोभीकरण केलेल्या ठिकाणी नागरिक थुंकून घाण करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी 10 जानेवारी ते 12 जानेवारी दरम्यान विशेष मोहीम महापालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC) सर्व क्षेत्रिय कार्य़ालयांतर्गत राबवण्यात आली. या कालावधीत 123 केसेस करुन 1 लाख 23 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ज्या नागरिकांकडून दंडाची रक्कम भरण्यास असमर्थता दर्शवली त्या नागरिकाकडून थुंकलेल्या ठिकाणी स्वच्छता करुन घेतली.

 

शहराची सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य टिकवण्यसाठी नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता केल्यास किंवा
थुंकल्यास महानगरपालिकेकडून दंडात्मक कारवाई केली
जाणार असल्याचे घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त आशा राऊत (Deputy Commissioner Solid Waste Management Asha Raut) यांनी सांगितले.

 

अशी केली कारवाई

– 10 जानेवारी 23 केसेस करुन 23 हजार रुपयांचा दंड वसूल केला.
– 11 जानेवारी 29 केसेस करुन 29 हजार रुपयांचा दंड वसूल केला.
– 12 जानेवारी 71 केसेस करुन 71 हजार रुपयांचा दंड वसूल केला.
– 10 ते 12 या तीन दिवसांत सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या 123 जणांवर कारवाई करुन 1 लाख 23 हजार रुपयांचा दंड वसुल केला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Municipal Corporation (PMC) | Strict action of the Municipal Corporation to prevent the spitting, cleaned the place where spitting was done

 

हे देखील वाचा :

Panipat Crime News | दुर्दैवी ! चहा बनवताना घडली दुर्घटना; पती-पत्नीसह 4 मुलांचा होरपळून मृत्यू

Maharashtra Government Recruitment | राज्यातील नोकरभरती होणार 15 ऑगस्टपूर्वी पूर्ण?; शासकीय यंत्रणा लागली कामाला

CM Eknath Shinde | अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या एकरकमी लाभ योजनेसाठी 100 कोटी, लवकरच 20 हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती करणार

 

Related Posts