IMPIMP

Pune Crime News | खासगी सावकाराची अवाजवी पैशांची मागणी, शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या; भोर तालुक्यातील धक्कादायक घटना

by nagesh
 Pune Crime News | a farmer committed suicide due to the money lenders fathers demands

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | खासगी सावकाराने (Private Lender) अवाजवी पैशांची मागणी केल्याने एका शेतकऱ्याने
गळफास (Hanging) घेऊन आत्महत्या केल्याची (Farmer Committed Suicide) धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील कुरुंगवडी
येथे घडली आहे. सतीश बाजीराव शिळीमकर Satish Bajirao Shilimkar (वय-43 रा. कुरुंगवडी, ता. भोर, जि. पुणे) असे आत्महत्या केलेल्या
शेतकऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी (Pune Crime News) खासगी सावकारावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सतीश शिळीमकर यांना आत्महत्येस प्रवृत्त करणे तसेच बेकायदा सावकारी प्रकरणी अमृत महादेव शिळीमकर (रा. तांभाड, ता. भोर, जि. पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सतीश शिळीमकर यांची पत्नी वैशाली शिळीमकर यांनी या संदर्भात राजगड पोलीस ठाण्यात (Rajgad Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime News)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश शिळीमकर यांनी त्यांच्या कुरुंगवडी येथील शेतातील आंब्याच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी पँटच्या खिशात चिठ्ठी लिहून ठेवली आहे. सतिश शिळीमकर याने तांभाड येथील अमृत शिळीमकर यांच्याकडून घेतलेल्या कर्जापोटी व्याजासह 28 लाखांची मागणी करीत आहेत. पैसे परत दिले नाही तर जमिन नावावर करुन देण्याची मागणी करत असल्याने त्यांचे व्याजाने घेतलेल्या पैशाचे मागणीला, धमकीला व जाचाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

 

भोर उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील
(Bhor Sub Divisional Police Officer Dhananjay Patil), राजगड पोलीस ठाण्याचे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पाटील (Senior Police Inspector Sachin Patil) यांनी घटनास्थळी भेट दिली.
सहायक पोलीस निरीक्षक संजय सुतनासे (API Sanjay Sutanase) तपास करत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime News | a farmer committed suicide due to the money lenders fathers demands

 

हे देखील वाचा :

Bad Cholesterol | खराब कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करण्यासाठी मदत करतील हे ५ आयुर्वेदिक उपाय, वाढेल गुड कोलेस्ट्रॉल

Narayan Rane | वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटाच्या युतीवर नारायण राणे यांचा ‘प्रहार’; म्हणाले…

Indrani Balan Winter T-20 League | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; पुनित बालन-केदार जाधव क्रिकेट अ‍ॅकॅडमी, न्युट्रीलिशियस् संघांची विजयी घौडदौड !!

 

Related Posts