IMPIMP

Pune Crime News | बेकायदा सावकारी करणार्‍या त्रासामुळे एकाची आत्महत्या; सिंहगड रस्त्यावरील किरकिटवाडी भागातील घटना

by sachinsitapure
Pune Crime News | One commits suicide due to harassment by illegal moneylenders; Incident in Kirkitwadi area on Sinhagad road

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | बेकायदा सावकारी (Illegal Moneylenders) करणार्‍याच्या त्रासामुळे एकाने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide In Pune) केल्याची घटना सिंहगड रस्त्यावरील किरकिटवाडी भागात घडली. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांच्या (Pune Rural Police) हवेली पोलीस ठाण्यात (Haveli Police Station) तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

निलेश जंगम (रा. किरकिटवाडी, सिंहगड रस्ता) असे आत्महत्या (Suicide Case) केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी बेकायदा सावकारी करणार्‍या सुहास दांडेकर, गोविंद मारुती भोपळे, वर्षा गोविंद भोपळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत निलेश जंगम यांच्या पत्नीने हवेली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी जंगम यांनी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी जप्त केले आहे. जंगम यांचे मित्र गोविंद भोपळे याने एकत्रित व्यवसाय सुरू करु, असे जंगम यांना सांगितले होते. भोपळे याने जंगम यांच्या नावाने बेकायदा सावकारी करणारा दांडेकर याच्याकडून साडेतीन लाख रुपये व्याजाने घेतले होते. (Pune Crime News)

भोपळे याने व्यवसाय सुरू न करता व्याजाने घेतलेले पैसे खर्च केले. जंगम यांनी पैसे परत करण्याची मागणी केली.
तेव्हा भोपळे आणि त्याच्या पत्नीने टाळाटाळ केली. दांडेकर याने व्याजासाठी त्रास देण्यास सुरुवात केली.
पतीला शिवीगाळ करुन दमदाटी करण्यात आली. दांडेकरच्या त्रासामुळे माझ्या पतीने राहत्या घरात गळफास
घेऊन आत्महत्या केली, असे जंगम यांच्या पत्नीने हवेली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
हवेली पोलीस ठाण्याचे अधिकारी अनमोल मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शीतल ठेंबे
(PSI Sheetal Thembe) तपास करत आहेत.

 

Related Posts