IMPIMP

Pune Crime News | औषधाच्या नावाखाली गोव्यातून विदेशी दारुची तस्करी, तळेगाव दाभाडे येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; 81 लाखाचा मुद्देमाल जप्त

by nagesh
Pune Crime News | Smuggling of foreign liquor from Goa under the guise of medicine, State Excise Department action at Talegaon Dabhade; 81 lakh worth of goods seized

तळेगाव दाभाडे : सरकारसत्ता ऑनलाईन  Pune Crime News | औषधाच्या नावाखाली गोव्यातून (Goa) बिअर (Beer) आणि विदेशी दारुची तस्करी (Foreign Liquor Smuggling) करत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (State Excise Department) तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) पथकाने ही कारवाई (Pune Crime News) सोमाटणे येथे करुन ट्रक चालकाला अटक केली आहे. या कारवाई बिअरचे बॉक्स, विदेशी दारू आणि ट्रक असा एकूण 81 लाख 16 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शंकरलाल नारायण जोशी (वय-46 रा. बस्सी, जि. उदयपूर, राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्या ट्रकचालकाचे
नाव आहे. त्याच्यासह ओमपुरी नावाच्या व्यक्तीवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
(Pune Crime News) मिळालेल्या माहितीनुसार, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून गोव्यात उत्पादन करण्यात आलेली व विक्रीसाठी परवाना असलेल्या दारुची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती.
त्यानुसार तळेगाव दाभाडे विभागाच्या पथकाने सायंकाळी सोमाटणे गावच्या हद्दीत सापळा रचला.
त्यावेळी एक कंटेनर ट्रक संशयावरुन पथकाने अडवला.
कंटेनरची तपासणी केली असता गोव्यातून औषधांची (Medicines) वाहतूक करण्याच्या बहाण्याने दारुची तस्करी होत असल्याचे आढळून आले.

 

उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी ट्रकमधून विविध ब्रँडची विदेशी दारु आणि बिअरचे 865 बॉक्स जप्त केले.
पथकाने एकूण 65 लाख 90 हजार 160 रुपये किमतीची विविध प्रकारची विदेशी दारु व बिअर जप्त केली.
दारू आणि वाहनासाह 81 लाख 16 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  Pune Crime News | Smuggling of foreign liquor from Goa under the guise of medicine, State Excise Department action at Talegaon Dabhade; 81 lakh worth of goods seized

 

हे देखील वाचा :

CCTV In Police Stations | राज्यातील 1 हजार 82 पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत – देवेंद्र फडणवीस

Maharashtra Farmer News | शेतकर्‍याची यशोगाथा ! मेहनत, जिद्द आणि शासनाची साथ; खडकाळ माळरानावर फुललेल्या फळबागेचा शेतकऱ्याला हात

Pune PMC Property Tax | पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, 40 टक्के मिळकतकराची सवलत कायम राहणार

 

Related Posts