IMPIMP

CCTV In Police Stations | राज्यातील 1 हजार 82 पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत – देवेंद्र फडणवीस

by nagesh
CCTV In Police Stations | CCTV system is working in 1 thousand 82 police stations in the state - Devendra Fadnavis

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – CCTV In Police Stations | राज्यातील 1 हजार 89 पोलीस ठाण्यांपैकी 1 हजार 82 पोलीस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. या ठिकाणी नियमितपणे कॅमेरे सुरु असणे आणि रेकॉर्डिंग जतन केले जाणे याबाबींचे ऑडिट केले जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान यासंदर्भात सदस्य अब्दुल्लाखान दुर्राणी (Abdullah Khan Durrani) यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

 

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यातील उर्वरित सात पोलीस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे काम नूतनीकरण आणि स्थलांतरामुळे प्रलंबित आहे.
तसेच सध्या बसविलेल्या कॅमेऱ्यांमध्ये ऑडिओ रेकॉर्डिंगची सुविधा नाही.
अर्थात याठिकाणी सीसीटीव्ही बसविण्याच्या कामांत विलंब झाल्यामुळे संबंधित सेवा पुरवठादारावर दंडात्मक कार्यवाही करण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

 

यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve), शशिकांत शिंदे (Shashikant Shinde),
अनिकेत तटकरे (Aniket Tatkare) यांनीही उपप्रश्न विचारले. त्याला उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले.

 

 

Web Title :- CCTV In Police Stations | CCTV system is working in 1 thousand 82 police stations in the state – Devendra Fadnavis

 

हे देखील वाचा :

Maharashtra Farmer News | शेतकर्‍याची यशोगाथा ! मेहनत, जिद्द आणि शासनाची साथ; खडकाळ माळरानावर फुललेल्या फळबागेचा शेतकऱ्याला हात

Pune PMC Property Tax | पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, 40 टक्के मिळकतकराची सवलत कायम राहणार

Sangli Crime | सांगलीत भाजप नगरसेवकाची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या, परिसरात प्रचंड खळबळ

 

Related Posts