IMPIMP

Pune Crime News | पुण्यात मांजामुळे दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी, रुग्णालायत उपचार सुरु

by nagesh
 Pune Crime News | two policemen injured by kite string on pune satara road

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  Pune Crime News | नायलॉन मांजाला (Nylon Manja) बंदी घातली असताना देखील त्याची छुप्या पद्धतीने विक्री होत आहे. नायलॉन मांजामुळे पक्षी जखमी होतातच शिवाय रस्त्याने जाणारे नागरिक देखील जखमी होत आहेत. संक्रांतीला (Makar Sankranti) पतंगबाजी करण्यासाठी वापरण्यात आलेल्या नायलॉन मांजामुळे दुचाकीवरुन जाणारे दोन पोलीस (Pune Police) कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात पुणे-सातारा रोडवरील शंकर महाराज उड्डाणपुलावर झाला. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

महेश पवार (Mahesh Pawar) आणि सुनील गवळी (Sunil Gawli) अशी गंभीर जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. पवार आणि गवळी दोघे शिवाजीनगर मुख्यालयात नियुक्तीस असून रविवारी दुचाकीवरून जात होते. त्यावेळी मांजा मानेला अडकल्याने महेश पवार यांच्या गळ्याला दुखापत झाली. तर त्यांच्यासोबत असलेले सुनील गवळी यांच्या हाताला मांजा गुंडाळला गेल्यामुळे हात कापला. पक्षीमित्र बाळासाहेब ढमाले हे शंकर महाराज उड्डाणपुलावरुन दुचाकीवरुन जात होते. त्यावेळी त्यांना हा प्रकार दिसला. त्यांनी दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. (Pune Crime News)

 

पतंगबाजी साठी नायलॉन मांजा वापरल्यामुळे शहराच्या विविध भागात घार, कावळा, कबुतर, पारवा या पक्षांना
दुखापत झाल्याची माहिती ढमाले यांनी दिली. रविवारी कसबा पेठेत मांजात अडकलेल्या तीन घारींची सुटका केली. ढमाले यांनी तीन घारींची मांजातून सुटका करुन कात्रज येथील प्राणी, पक्षांच्या अनाथालयात उपचारासाठी दाखल केले.

 

Web Title :- Pune Crime News | two policemen injured by kite string on pune satara road

 

हे देखील वाचा :

Nana Patole | ‘बेईमानी करुन दुसऱ्यांची घरं फोडणाऱ्या भाजपला..’, नाना पटोलेंचा इशारा

Punit Balan Celebrity League (PBCL) | दुसरी ‘पुनित बालन सेलिब्रीटी लीग’ क्रिकेट स्पर्धा; पन्हाळा जॅग्वॉर्स संघाने विजेतेपद पटकावले

Maharashtra Politics | ठाकरे गटाची वाढणार चिंता! तीस-तीस घोटाळ्यात ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचे नाव

 

Related Posts