IMPIMP

Nana Patole | ‘बेईमानी करुन दुसऱ्यांची घरं फोडणाऱ्या भाजपला..’, नाना पटोलेंचा इशारा

by nagesh
Nana Patole | ambedkar thackeray alliance has nothing to do with maha vikas aghadi nana patole reacts

नाशिक : सरकारसत्ता ऑनलाईन –  पदवीधर (Teachers) आणि शिक्षक मतदारसंघ (Graduates Constituencies) राज्यातील सर्व उमेदवारांबाबत आज चित्र स्पष्ट होईल, असे काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी सांगितले. तसेच नाशिक पदवीधर निवडणुकीमध्ये (Nashik MLC Election) जो डाव देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजपने (BJP) खेळला होता, तो आता जनतेला समजला आहे. दुसऱ्यांची घरे फोडणाऱ्या भाजपला जनता त्यांची जागा दाखवेल, असा सूचक इशारा नाना पटोले (Nana Patole) यांनी दिला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसने घोषणा केलेले उमेदवार डॉ. सुधीर तांबे (Dr. Sudhir Tambe) आणि त्यांचा मुलगा सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांनी बंडखोरी केल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. अशातच शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांना शिवसेनेच्या ठाकरे गटाने (Shiv Sena Thackeray Group) पाठिंबा दिल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचा नेमका उमेदवार कोण? यावर नाना पटोले (Nana Patole) यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.

 

नाना पटोले म्हणाले, अद्याप कोणालाही पाठिंबा जाहीर केलेला नाही. या माध्यमांनी चालवलेल्या बातम्या आहेत.
आमचा अंतिम निर्णय होईल आणि आज पदवीधर मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) उमेदवार जाहीर करु, तसेच नागपूरवरही चर्चा होणार असल्याचे पटोले यांनी सांगितले.

 

राज्यातील पाचही जागा महाविकास आघाडी जिंकेल अशी स्थिती असल्याचे सांगत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.
बेईमानी करुन दुसऱ्यांची घरं फोडणाऱ्या भाजपचा खरा चेहरा पदवीधरांच्या, शिक्षकांच्या लक्षात आला आहे.
त्यामुळे या दोन्ही निवडणुकीत लोकं भाजपला त्यांची जागा दाखवतील, असा इशारा नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
पैशांच्या आणि सत्तेच्या जोरावर घरं फोडण्याचं पाप भाजपने केले.
त्याचे परिणाम भाजपला भोगावे लागतील, असा इशारा नाना पटोले यांनी भाजपला दिला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  Nana Patole | nana patole answer who is mva congress candidate in nashik graduate constituency election after sudhir tambe rebel

 

हे देखील वाचा :

Punit Balan Celebrity League (PBCL) | दुसरी ‘पुनित बालन सेलिब्रीटी लीग’ क्रिकेट स्पर्धा; पन्हाळा जॅग्वॉर्स संघाने विजेतेपद पटकावले

Rohit Pawar | सत्यजीत तांबेंच्या भाजपसोबत झालेल्या बैठकीत राम शिंदे मध्यस्थं; वृत्तावर पहिल्यांदाच बोलले रोहित पवार, म्हणाले…

Maharashtra Politics | ठाकरे गटाची वाढणार चिंता! तीस-तीस घोटाळ्यात ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचे नाव

 

Related Posts