IMPIMP

Pune Crime | …म्हणून लक्ष्मण जगताप यांच्या भावाच्या कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब फेकले, आरोपींची कबुली

by nagesh
Maharashtra MLC Election | bjp mla laxman jagtap brother hits back shivsena over mlc elections 2022 vidhanparishad election 2022

पुणे /पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन –  Pune Crime | भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप (BJP MLA Laxman Jagtap) यांचे बंधू शंकर जगताप (Shankar Jagtap) यांच्या कार्यालयावर काल (मंगळवार) दुपारी तीनच्या सुमारास पेट्रोल बॉम्ब फोडल्याची (Petrol bomb attack) घटना घडली होती. शंकर जगताप यांच्या पुण्यातील (Pune Crime) पिंपळे गुरव येथील कार्यालयासमोर ही घटना घडली. याप्रकरणी राहुल राम साळुंके Rahul Ram Salunke (वय-39 रा. पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात (Sangvi police station) फिर्याद दिली. त्यानुसार तिघांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

पोलिसांनी तीन आरोपीपैकी दोघांना शहरातून तर एकाला शहराच्या बाहेरून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे प्राथमिक चौकशी केली असता त्यांना केवळ नाव कमावण्यासाठी हा प्रकार केल्याचे सांगितले.
परंतु अद्याप अटकेची आणि इतर कायदेशीर प्रक्रिया (Legal process) शिल्लक असून मूळ उद्देशापर्यंत पोलीस पोहचले (Pune Crime) नाहीत.
अटक प्रक्रिया पूर्ण करुन त्यांना न्यायालयात हजर करायचे आहे.
त्यानंतर चौकशीत सर्व उघड होईल असे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक सुनील तांबे (Police officer Sunil Tambe) यांनी सांगितले.

 

घटना घडल्यानंतर पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता.
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासून आरोपींचा शोध घेण्यासाठी पाच पथके तैनात केली होती.
तसेच आरोपींना पकडण्यासाठी शहरात विविध ठिकाणी नाकाबंदी (Pune Crime) करण्यात आली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे गुरव येथील पेट्रोलपंपाजवळ माजी नगरसेवक शंकर जगताप यांचे चंद्ररंग डेव्हलपर्सचे
(Chandrarang Developers And Builders Pvt. Ltd.) कार्यालय आहे.
काल दुपारी तीनच्या सुमारास एका दुचाकीवरुन तिघेजण आले. जगताप यांच्या कार्यालयासमोर थंबले.
त्यातील दोघांनी कार्यालयाच्या दिशेने पेट्रोलने भरलेल्या बाटल्या फेकल्या आणि ते घटनास्थळावरुन पळून गेले होते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title : Pune Crime | petrol bottles thrown mla laxman jagtaps brothers office publicity pune crime

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यात गांजा, MD, LSD सह दोन जणांना अटक, गुन्हे शाखेकडून 8 लाखांचा मुद्देमाल जप्त

Sharad Pawar | एसटी विलीनीकरणाच्या मुद्द्यावरुन शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले…

Coronavirus in Maharashtra | महाराष्ट्रात तिसर्‍या लाटेचा धोका ! घाबरु नका, पण काळजी घ्या; राजेश टोपे म्हणाले…

 

Related Posts